narendra modi and amit shah esakal
देश

BJP Candidate List : सोलापूर लोकसभेसाठी भाजपची मोठी खेळी; दिला तरुण उमेदवार, देशभरातून पाचवी यादी जाहीर

BJP Candidate List for Loksabha Election 2024 : भारतीय जनता पक्षाने रविवारी रात्री लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या तीन नावांचा समावेश आहे.

संतोष कानडे

BJP Candidate List for Loksabha Election 2024 : भारतीय जनता पक्षाने रविवारी रात्री १११ लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या तीन नावांचा समावेश आहे.

पाचव्या यादीतील नावे

  • भंडारा-गोंदिया- सुनील मेंढे

  • गडचिरोली- अशोक नेते

  • सोलापूर- राम सातपुते

सोलापूरचे खासदार सिद्धेश्वर महाराज यांच तिकीट कापलं असून आता सोलापूरमधून राम सातपुते विरूद्ध प्रणिती शिंदे असा सामना रंगणार आहे. राम सातपुते पहिल्या टर्मचे माळशिरसचे आमदार आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

दरम्यान, भाजपने अभिनेत्री कंगना रणौत हिलादेखील उमेदवारी जाहीर केली आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडीमधून कंगनाला लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे.

महाराष्ट्रातल्या पहिल्या यादीत जाहीर झालेले भाजप उमेदवार

नागपूर- नितीन गडकरी, नंदूरबार- हिना गावित, धुळे -सुभाष भामरे, जळगाव- स्मिता वाघ, रावेर- रक्षा खडसे, अकोला- अनुप धोत्रे, वर्धा- रामदास तडस, चंद्रपूर- सुधीर मनगुंटीवार, नांदेड- प्रताप पाटील चिखलीकर, दिंडोरी- भारती पवार, भिवंडी- कपिल पाटील, मुंबई उत्तर- गोयल, मुंबई उत्तर पूर्व - मिहीर कोटेचा, अहमदनगर -सुजय विखे पाटील, बीड- पंकजा मुंडे, लातूर- सुधाकर शृंगारे, माढा - रणजितसिंह नाईक निंबाळकर, जालना- रावसाहेब दानवे सांगली- संजयकाका पाटील, पुणे - मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

भाजपने रविवारी पाचव्या यादी जाहीर केली असून देशभरातील १११ उमेदवार घोषित केले आहे. यामध्ये दिग्गजांना नारळ दिल्याचं दिसून येत आहे. वरुण गांधी यांच्याजागी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले जितीन प्रसाद यांना तिकीट दिलं आहे.

तसेच गाझियाबाद मतदारसंघातून दोनवेळा खासदार असलेले व्हीके सिंह यांचं तिकीट कापून अतुल गर्ग यांना दिलं आहे. यादी जाहीर होण्यापू्र्वीच जनरल व्हीके सिंह यांनी सोशल मीडियावर निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Fraud: मॅनेजरने पत्नी आणि मेव्हण्यासोबत उडवले ५९० कोटी; देशातील मोठ्या बँकेतून पैसे कसे गायब झाले?

Latest Marathi News Live Update : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर

Somnath Suryawanshi Case: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

SCROLL FOR NEXT