BJP website
BJP website 
देश

सत्ताधारी भाजपची वेबसाईट 14 दिवसांनंतरही बंदच!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाची वेबसाईट 5 मार्चला अज्ञात हॅकर्सकडून हॅक करण्यात आली होती. आज (ता. 18) चौदा दिवस होऊन गेले, तरीही अजून त्यांच्या साईटची स्थिती ही 'जैसे थे'च आहे.

वेबसाईट हॅक करून हॅकर्सकडून या वेबसाईटवर अश्लील छायाचित्रेही अपलोड करण्यात आली होती. तसेच वेबसाईटच्या होमपेजवर मोदी व जर्मनीचे चान्सलर अँजेला मार्केल यांच्यावरील मीम दिसत होते. छत्तीसगडमधील भाजप कार्यकर्त्यांनी याबाबत पोलिसांमध्ये तक्रारही नोंदवली आहे. 

माहिती प्रसारणमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले की, आमची वेबसाईट काही मिनिटांसाठी हॅक झाली होती. त्यावर सध्या काम सुरू असून, ती लवकरच पूर्ववत होईल. मोठ्या प्रमाणात अॅक्टीव्ह असलेल्या भाजपच्या आयटी सेलला त्यांची वेबसाईट हॅक केल्यामुळे ट्रोल केले जात आहे.

भाजपची वेबसाईट हॅक झाल्यानंतर काँग्रेसच्या सोशल मिडिया प्रभारी दिव्या स्पंदना यांनी नेटीझन्सना ट्विट करून भाजपची वेबसाईट बघण्याचे आवाहन केले. भाजपची http://www.bjp.org/ ही अधिकृत वेबसाईट आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT