Assembly Election Results 2023 esakal
देश

BJP Success in Assembly Election : भाजप पराभूत का होत नाही? जोरदार विजयाची 5 कारणे अन् विश्लेषण

देशातील चार राज्यांच्या निवडणूक निकालांत भाजपनं तीन राज्यांत जोरदार मुसंडी मारली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपनं स्पष्ट बहुमत प्राप्त केलं आहे.

Assembly Election Results 2023 : देशातील चार राज्यांच्या निवडणूक निकालांत भाजपनं तीन राज्यांत जोरदार मुसंडी मारली आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपनं स्पष्ट बहुमत प्राप्त केलं आहे. त्यामुळं भाजप आता 12 राज्यांमध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करणारा पक्ष ठरला आहे. याच निवडणूक निकालांचं मुद्देसुद सविस्तर विश्लेषण सकाळचे संपादक सम्राट फडणीस यांनी ई-सकाळशी बोलताना केलं आहे. याचवेळी संपादक फडणीस यांनी भाजपच्या विजयाचे पाच मुद्दे मांडले आहेत.

1. भाजप निवडणुकीला चेहरा देतं

पहिला मुद्दा म्हणजे, भाजप कोणत्याही निवडणुकीसाठी चेहरा देतं. काॅंग्रेस किंवा अन्य पक्षांनी २०१४ नंतर निवडणुकीला चेहरा देण्यास सुरुवात केली. पण, त्यांच्याआधी २०१३ पासून भाजपनं 'मोदी' हा चेहरा लोकसभा निवडणुकीसाठी पुढं केला, तेव्हापासून २०१४ ते २०२४ पर्यंत त्यांची वाटचाल सुरु आहे. या दहा वर्षांत झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भाजपनं एक चेहरा दिला, तो चेहरा सातत्यानं मोदींच्या नेतृत्वाचा ठेवला. उत्तर प्रदेशात निवडणूक झाली, त्यावेळी मोदी आणि योगी हे चेहरे ठेवले. त्यातही एक राज्याचा चेहरा आणि दुसरा देशाचा चेहरा म्हणून पुढं केला. ही भाजपची अनोखी स्ट्रेटर्जी होती. याचा आताच्या निवडणुकांमध्ये देखील भाजपनं आक्रमकपणे वापर केला आहे. राजस्थानमध्ये देखील याच स्ट्रेटर्जीचा चांगल्या प्रकारे वापर त्यांनी केला. भाजपचा निवडणुकीतील सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे, त्यांनी या निवडणुकीसाठी एक चेहरा दिला होता. निवडणुकीत अपयश आलं तर याची जबाबदारी स्थानिक नेत्यांनी घ्यायची आणि यात यश आलं तर त्याला एक चेहरा असावी, यासाठी त्यांनी मोदींचा चेहरा दिला.

2. भाजपची केडर बेस पार्टी

भाजपच्या यशात दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, भाजपची केडर बेस पार्टी आहे. स्वातंत्र्यानंतर काॅंग्रेसची तीन दशकांची वाटचाल बघितली, तर १९८० मध्ये केडरचा मोठा वाटा असायचा. केडर म्हणजे, अगदी तळातला (जमिनीवरचा) कार्यकर्त्या म्हणजेच सतरंज्या उचलणारा कार्यकर्त्या असं आपण हेटाळणी करुन म्हणतो तो. केडर असणं ही भाजपसाठी महत्वाची बाब आहे. काॅंग्रेसकडं केडर आहे, पण त्या केडरला खूश ठेवणारे नेते नाहीयेत. ते मोटिव्हेट देऊ शकतात का? तशी परिस्थितीही आता राहिली नाहीये. काॅंग्रेस केडर बेस पार्टीपासून खूप दूर गेला आहे. काही नेत्यांच्या भोवतीचा पक्ष बनत गेला आणि भाजप केडर पार्टी बनत गेला. भाजपनं केडरसाठी काय केलं? केडर कोअर मतदार म्हणून मोठं परिवर्तन घडवलं आहे. भाजप हा उजवी विचारसणीचा पक्ष आहे, असं मानतो. त्यांचा पक्ष हा हिंदूत्व मानतो. भाजपची व्यूहरचनाही पूर्णपणे हिंदूत्वाची आहे. या निवडणुकीत मोदींच्या ४५ प्रचार सभा झाल्या. यात मोदींनी राम, राम मंदिर, हिंदूत्व, पाप-पुण्य हे शब्द वापले आणि हेच शब्द केडर कोअर मतदारांच्या जवळ जाणारे असतात, असं भाजप मानतं आणि त्याचा वापर ते वारंवार करत असतं, त्यामुळे केडर बेस पार्टी हा देखील मुद्दा विजयाचं कारण ठरु शकला असावा.

3. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा वापर

गेल्या पाच-दहा वर्षात अतिशय चमकदार योजना मोदी सरकारने आणल्या. स्मार्ट सिटी, आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया इत्यादी. केंद्रातील याच योजनांचा वापर ग्रामीण भागात होतो का? याची काळजी सरकार घेत असतं. शेतकऱ्यांच्या अकाऊंटवर थेट पैसे पाठवणे, त्यामुळं शेतकरी वर्गाला खूश करण्याचा हा प्रयत्न असतो. केंद्रीय योजनेतून ते भाजप विरोधी सरकारला दुजाभाव दाखवू शकतात. योजनेसाठी ते कोणताही पाठिंबा सपोर्ट देणार नाही, कारण तुमचं सरकार आमच्या बाजूने नाही, हा मेसेज राज्यात पोहचवू शकतात. त्यामुळंच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केंद्र सरकारच्या ह्या योजनांचा वापर ते स्पष्टपणे बोलून दाखवतात. शिवराज चव्हाणांची लाडली योजनाही खूप गाजली, त्याचा त्यांना लाभच झाला. राजस्थानात भाजपचं सरकार नव्हतं, त्यामुळं त्यांनी योजनांवर टीका करायला सुरुवात केली. मोदींनी रेवडी शब्द वापरला, त्यावेळी काॅंग्रेसनं टीकेची झोड उडवली होती. त्यामुळंच ते केंद्रीय योजनांचा मजबूत सपोर्ट ते भाजपशासित राज्यांना देतात.

5. कोणताही उपक्रम-कार्यक्रमाचं 'सेलिब्रेशन'

भाजप कोणताही उपक्रम किंवा कार्यक्रमाचा सेलिब्रेशन करत असतं. म्हणजेच, कोणत्याही सरकारला कोणतंही मंदिर बांधता येत नाही किंवा मस्जिद बांधा येत नाही. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र मानलं जातं. मंदिर कोण बांधतं? तर त्या-त्या विभागाच्या निधीतून.. पण दिसताना काय दिसतं भाजपनं! कारण, भाजपचे नेते, कार्यकर्ते हे मंदिरासाठी काम करतात. भाजप सतत त्याचा इव्हेंट करत राहतं आणि याचा पक्षाला देखील चांगला फायदा होताना दिसतो. या निवडणुकीत देखील असंच पाहायला मिळालं.

5. अजेंडा तयार करणं

भाजप गावांपासून जिल्ह्यांपर्यंत कार्यकर्त्यांची फळी तयार करतं. आणि नंतर त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत जनसंपर्क वाढवतं. त्यानंतर भाजप कोणत्याही निवडणुकीला सामोरे जातं. भाजप आपला अजेंडा तयार करुन जनमाणसांत पोहचवतं. सुषमा स्वराज यांच्यानंतर मास लिडर म्हणून वसुंधरा राजे यांच्याकडं पाहिलं जात होतं, पण त्यांच्या नेतृत्वाला निवडणुकीत पुढं केलं नाही. याचाच अर्थ भाजप कोणतेही प्रयोग करायला घाबरत नाही, हे यावरुन स्पष्ट होतं आणि याचा फायदा भाजपला निवडणुकीत होताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात कारमध्ये प्रेमी युगुलाचे अश्लील चाळे, नको त्या अवस्थेत सापडले; तरुणी लहान असल्यानं पोलिसांनी ताकीद देत सोडलं, VIDEO VIRAL

Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Latest Marathi Breaking News Live Update : पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या रेस्टॉरंट अँड बार मध्ये दरोडा

Aadhar Card Updates : आधारकार्ड मध्ये होणार मोठा बदल! नवीन आधार असणार अधिक सुरक्षित! जाणून घ्या काय होणार बदल

विदर्भातही बिबट्याची दहशत! नागपुरातील भांडेवाडी परिसरात वावर, वनविभागाचं पथक दाखल

SCROLL FOR NEXT