Narendra-Modi-and-JP-Nadda esakal
देश

Narendra Modi : 'चाय पे चर्चा' या यशस्वी प्रयोगानंतर भाजपची नवी मोहीम; उद्या 'टिफिन मीटिंग'चा शुभारंभ

संतोष कानडे

BJP Latest News : पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला चहावाले समजतात. त्याच जोरावर त्यांनी आपली आणि पक्षाची लोकप्रियता मिळवली. 'चाय पे चर्चा' ह्या त्यांच्या यशस्वी प्रयोगानंतर आता भाजपकडून नव्या मोहिमेची घोषणा करण्यात आलेली आहे.

पुढच्या वर्षी २०२४मध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडत आहेत. नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत पराभव झाला तर काँग्रेसला अभूतपूर्व यश मिळालं. त्यामुळे भाजपही नव्या जोमाने कामाला लागल्याचं दिसून येत आहे.

मोदी सरकारची ९ वर्षांची कामगिरी लोकांना समजावून सांगण्यासाठी भाजपने आता 'टिफिन बैठक' या लेबलखाली मोहीम सुरु केली आहे. उद्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे या मोहिमेची सुरुवात करणार आहेत. आग्रा येथून भाजपच्या या नव्या मोहिमेची सुरुवात होईल.

भाजपच्या प्रत्येक आमदार आणि खासादाराला या मोहिमेसंदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल, विनोद तावडे आणि तरुण चुग यांना या मोहिमेचं प्रभारी बनवण्यात आलेलं आहे.

भाजपच्या वतीने २ महिन्यांमध्ये ४ हजार विधानसभा मतदारसंघांमध्ये या टिफिन मीटिंगचे आयोजन करण्यात आलेले आहे. या बैठकीच्या माध्यमातून समाजाच्या प्रत्येक स्तरासोबत बसून भोजन करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. या बैठाकंमध्ये संबंधित विधानसभा मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे आजी-माजी प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Latest Marathi Breaking News Live Update: महापालिका निवडणुकीत ‘महाआघाडी’चे संकेत

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT