ahul Gandhi Spotted in Nightclub e sakal
देश

नेपाळच्या नाईटक्लबमध्ये दिसले राहुल गांधी, व्हिडिओ शेअर करत भाजपची टीका

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या नेपाळच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधींच्या नेपाळ दौऱ्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये ते काठमांडूमधील नाईट क्लबमध्ये दिसत आहेत. हा व्हिडिओ ट्विट करून भाजपने (Congress) काँग्रेस आणि राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. हा व्हिडिओ नेपाळच्या लॉर्ड ऑफ द ड्रिंक्सचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपचे सोशल मीडिया प्रभारी अमित मालवीय यांनी ट्विट करून हा व्हिडिओ शेअर केला आहे. मुंबईवर हल्ला झाला तेव्हा राहुल गांधी नाईट क्लबमध्येच होते. आता त्यांचा पक्ष अडचणीत आला असतानाही ते नाईट क्लबमध्येच आहेत, असं मालवीय म्हणाले.

भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, राहुल गांधी काय करत आहेत ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. पण राजस्थानच्या जोधपूरमध्ये हिंसाचार होत असताना राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे, राजस्थान जळत आहे. यावर चिंता व्यक्त करण्याऐवजी राहुल गांधी नेपाळमधील नाईट क्लबमध्ये पार्टी करताना दिसत आहेत. त्यांनी भारतातील लोकांसोबत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत, असं ते म्हणाले.

दरम्यान, किरण रिजजू यांनी देखील राहुल गांधींचा व्हिडिओ शेअर करत निशाणा साधला. सुट्टी, पार्टी, हॉलिडे, पिकनिक, खासगी टूर या गोष्टी आता देशासाठी नवीन नाहीत, असं रिजजू म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT