Chandrakant Bavankule and uddhav thackeray sakal
देश

Bjp Vs Thackeray : बहुधा तुम्हाला अल्झायमरचा आजार झाला आहे; बावनकुळेंची ठाकरेंवर जोरदार टीका

2024 साली जनता तुम्हाला तुमच्या आवडीचं घरी बसण्याचं काम देणार

सकाळ डिजिटल टीम

Bjp Vs Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. खासदार संजय राऊत यांनी ‘आवाज कुणाचा’ या पॉडकास्ट मध्ये ठाकरेंची मुलाखत घेतली आहे.या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर शाब्दिक हल्ला केला.

यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे यांनी ट्विट द्वारे तिखट प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकार चालवलं. अडीच वर्षांत अडीच दिवसही ज्यांना मंत्रालयात जावं वाटलं नाही ते उद्धव ठाकरे मोदीजींनी नऊ वर्षांत काय केलं ? असा प्रश्न विचारत आहेत.

बहुधा तुम्हाला अल्झायमरचा आजार झाला आहे. कारण 2019 च्या निवडणुकीत मोदीजींच्या कर्तृत्वावर तुम्ही शेकडो भाषणं केली आणि जिंकून आलात. जरा चांगल्या न्यूरो सर्जनला भेटून उपचार घ्या. म्हणजे मोदींवर केलेली भाषण तुम्हाला आठवतील असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे ट्विट द्वारे म्हणाले.

महायुतीच्या जागा वाटपाची चिंता तुम्ही करू नका, तुमची शिल्लक सेना तरी निवडणुकीपर्यंत तुमच्यासोबत राहते का ? त्याकडे लक्ष द्या. आत्मनिर्भर भारतासाठी महायुती झाली आहे. तर तुमची महाविकास आघाडी सत्ता आणि पैसा मिळवण्यासाठी झाली. तुमच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी 5 दावेदार बाशिंग बांधून बसले आहेत. त्यात तुम्हीही बोहल्यावर बसण्यासाठी उत्सुक आहात. पण 2024 साली जनता तुम्हाला तुमच्या आवडीचं घरी बसण्याचं काम देणार आहे. असेही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे ट्विट द्वारे म्हणाले.

30 वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता मिळवून मुंबईची ज्यांनी लूट केली आणि मुंबईतील मराठी माणसाला विकासापासून दूर ठेवलं. ते उद्धव ठाकरे आज मुंबईची चिंता करत आहेत. मुंबईवरील तुमचं बेगडी प्रेम ऊतू जात आहे. मुंबई तोडणार असं सांगून तुम्ही मुंबईकरांची दिशाभूल करत आहात. मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडणार नाही पण येत्या निवडणुकीत तुमच्या भ्रष्ट कारभारातून मात्र मुंबई नक्की मुक्त होईल.असेही बावनकुळे म्हणाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT