amit shah- narendra modi, arvind kejriwal
amit shah- narendra modi, arvind kejriwal 
देश

भाजप आमदाराच्या पोराकडे सापडले ८ कोटी अन् अटक सिसोदियांना; केजरीवालांचा भाजपला टोला

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी (4 मार्च 2023) कर्नाटकमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. केजरीवाल म्हणाले की, भाजप नेत्याच्या मुलाला ८ कोटी रुपयांसह पकडण्यात आले. परंतु मनीष सिसोदिया यांना अटक केली. आम आदमी पक्षाची संघटना झपाट्याने वाढत आहे, असेही ते म्हणाले.

केजरीवाल म्हणाले की, कर्नाटकची जनता खूप चांगली आहे, देशभक्त आहे, पण इथले नेते खूप वाईट आहेत. कर्नाटक सरकार हे ४० टक्के कमिशन असलेले सरकार आहे. आज या नेत्यांमुळे कर्नाटकची बदनामी देशभरात आणि जगात झाली आहे. येथे होणाऱ्या कोणत्याही सरकारी कामात येथील नेत्यांना ४० टक्के कमिशन द्यावे लागते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधत केजरीवाल म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच अमित शहा आले होते, त्यांनी मोठ-मोठ्या गोष्टी सांगितल्या. आमचे सरकार बनवा, आम्ही भ्रष्टाचार दूर करू, असे ते म्हणत होते. 'शहा यांना कोणीतरी आठवण करून दिली की, सध्या तुमचेच सरकार आहे. पाच वर्षे तुम्ही काय करत होता? असा सवाल केला.

केजरीवाल म्हणाले की, अमित शहा विमानाने परत जाताच दुसऱ्या दिवशी त्यांच्या पक्षाच्या नेत्याचा एक मुलगा ८ कोटी रुपयांसह पकडला गेला, परंतु त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. केजरीवाल म्हणाले की, पुढील वर्षी भाजप त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊ शकते. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी उपहासात्मक स्वरात म्हटले की, रंगेहात भाजप नेत्याच्या मुलाला पकडले पण मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली. हा मोठा अन्याय आहे.

केजरीवाल म्हणाले की, मनीष सिसोदिया यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात काहीही सापडले नाही. मनीष सिसोदिया यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप भाजपचे लोक करतात. तसे असते तर त्यांच्या घरात थोडे तरी पैसे सापडले असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT