BS Yediyurappa esakal
देश

Karnataka Election : कर्नाटकात भाजप 125 ते 130 जागा जिंकणार; माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा

शेट्टर यांना हुबळी-धारवाडची जागा जिंकणं खूप अवघड आहे.

Balkrishna Madhale

लिंगायत नेत्याला मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित करण्याच्या मागणीबाबत येडियुरप्पा म्हणाले, 'सुमारे 85 टक्के लिंगायत समाज भाजपला पाठिंबा देत आहे. पुढचा मुख्यमंत्री लिंगायत व्हावा, अशी मागणी आमचे अनेक नेते करत आहेत. साहजिकच आपलं केंद्रीय नेतृत्व निवडणुकीनंतर निर्णय घेईल.'

Karnataka Assembly Election 2023 : 224 सदस्यांच्या विधानसभेत भाजप 125-130 जागा जिंकून कर्नाटकमध्ये सत्तेत परत येईल, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत केला.

माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर (Jagdish Shettar) यांनी अलीकडंच भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. त्यांच्यासाठी ही निवडणूक एक आव्हान असणार आहे. येडियुरप्पा म्हणाले, 'माजी मुख्यमंत्र्यांना हुबळी-धारवाड जागेवर कडवी झुंज द्यावी लागेल आणि यात त्यांचा पराभव होईल.'

येडियुरप्पा म्हणाले, 'किमान 80 महत्त्वाच्या विधानसभा जागांना भेट देण्याची आमची योजना आहे. त्यासाठी आम्ही एका दिवसांत चार जागांचं लक्ष्य ठेवलंय. मी राज्यभर दौरा केला आहे आणि मला खात्री आहे की, भाजपला 125 ते 130 जागा मिळतील. आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल आणि सरकार स्थापन करू.'

'शेट्टर यांना परिणाम भोगावे लागतील'

येडियुरप्पा पुढं म्हणाले, 'जगदीश शेट्टर यांना त्यांच्या पत्नीला तिकीट देण्याचं आश्वासन दिलं होतं. अमित शाह यांनी वैयक्तिकरित्या त्यांना फोन करून राज्यसभा सदस्य आणि नंतर केंद्रीय मंत्री होण्यास सांगितलं. त्यांनी याला नकार दिला. याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील.'

माझ्या मते, शेट्टर यांना हुबळी-धारवाडची जागा जिंकणं खूप अवघड आहे. शेट्टर यांनी बीएल संतोष यांच्यावर आरोप केलाय की, त्यांनी त्यांचं तिकीट कापलं. यावर येडियुरप्पा म्हणाले, 'हे खरं नाही. पक्षात सर्व समान आहेत. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या म्हणण्यावर सर्वांचा विश्वास आहे.'

काँग्रेसच्या PayCM प्रचाराचा भाजपवर किती परिणाम होईल? या प्रश्नावर येडियुरप्पा म्हणाले, 'याचा कोणताही परिणाम होणार नाही. हे सर्व काँग्रेसनं पसरवलेलं खोटं आहे. यात तथ्य नाही. जनता काँग्रेसला धडा शिकवेल. लिंगायत नेत्याला मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित करण्याच्या मागणीबाबत येडियुरप्पा म्हणाले, 'सुमारे 85 टक्के लिंगायत समाज भाजपला पाठिंबा देत आहे. पुढचा मुख्यमंत्री लिंगायत व्हावा, अशी मागणी आमचे अनेक नेते करत आहेत. साहजिकच आपलं केंद्रीय नेतृत्व निवडणुकीनंतर निर्णय घेईल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT