BJP ZP Member Shweta Singh Gaur esakal
देश

भाजपच्या महिला नेत्यानं साडीनं घेतला गळफास

सकाळ डिजिटल टीम

इंद्रनगर येथील राहत्या घरी त्यांनी साडीनं गळफास घेतलाय.

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) बांदा जिल्ह्यात जिल्हा पंचायत सदस्या श्वेता सिंह गौर (Shweta Singh Gaur) यांचा मृतदेह संशयास्पद लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडालीय. इंद्रनगर येथील राहत्या घरी त्यांनी साडीनं गळफास घेतलाय. श्वेता सिंह या जसपुरा भागातील प्रभाग 12 मधून भाजपच्या जिल्हा पंचायत सदस्य होत्या. पती दीपक सिंग गौर हे घरी नव्हते. त्यांचा फोनही बंद आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस (UP Police) ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केलाय. श्वेता सिंहनं काल रात्री एक व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स (WhatsApp Status) टाकून लिहिलं होतं की, जखमी नाग, जखमी वाघ आणि अपमानित महिलेला नेहमी घाबरलं पाहिजं. सध्या या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

35 वर्षीय श्वेता सिंह गौर या भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसही होत्या. त्यांनी समाजशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं. श्वेता यांना तीन मुली आहेत. तपासादरम्यान एसपी अभिनंदन म्हणाले, सध्या जिल्हा पंचायत सदस्य श्वेता सिंह गौर यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलीय. तत्काळ माहिती मिळताच पोलीस, श्वानपथक व इतर पथके घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर खोली आतून बंद असल्याचं समोर आलंय. तिचा आणि तिच्या पतीमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. सासरची बाजू आणि माहेरी यांच्यात समझोता झाल्याची चर्चा होती. आजही दोघांमध्ये वाद झाला, त्याचा राग आल्यानं त्यांनी हे पाऊल उचललं, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT