Mallikarjun Kharge esakal
देश

Mallikarjun Kharge : भाजपची स्थिती ‘शायनिंग इंडिया’सारखी होईल; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा दावा

अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या काँग्रेस कार्यकारी समितीची (सीडब्ल्यूसी) बैठक आज पार पडली

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : लोकसभेच्या २००४ च्या निवडणुकीत भाजपने ‘शायनिंग इंडिया’ची घोषणा केली होती. सर्व देशात भाजपच सत्तेत येणार असे चित्र उभारण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात काँग्रेसची सत्ता आली. त्याचधर्तीवर यावेळी सुद्धा ‘मोदी की गॅरंटी’चा जप केला जात आहे. परंतु यावेळी मतदार मोदींच्या गॅरंटीची स्थिती ‘शायनिंग इंडिया’सारखी करणार असल्याचा दावा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.

अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या काँग्रेस कार्यकारी समितीची (सीडब्ल्यूसी) बैठक आज पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मल्लिकार्जुन खरगे होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेचे अभिनंदन केले. यामुळे समाजातील सर्व क्षेत्रातील व्यक्तींच्या मनातील भावना जाणून घेता आल्या. या न्याय यात्रेला लोकांचे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून यात मतदारांचा लक्षात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी देशातील मतदारांना बदल हवा असल्याचे सांगून काँग्रेस अध्यक्ष खरगे म्हणाले, ‘‘पंतप्रधान दररोज मोदी की गॅरंटी सांगत आहेत.

परंतु गेल्या दहा वर्षात त्यांची एकही गॅरंटी पूर्ण झालेली नाही. यामुळे २००४ मध्ये भाजपच्या इंडिया शायनिंगच्या अभियानाने देशात एक खोटे वातावरण निर्माण झाले होते. त्याचप्रकारचे वातावरण आता तयार झालेले आहे. त्यामुळे मतदार यावेळीही मोदी की गॅरंटीला इंडिया शायनिंगसारखे झिडकारून लावतील, असा दावाही त्यांनी केला. यावेळी माजी अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : केतनला धक्का कोणी दिला? पक्का पुरावाच नाही; पोलिसांनी कोर्टाकडे मागितली सियाच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीची परवानगी

मुंबईसे वांद्रे कैसे जाते है? थेट पाकिस्तानमधून फोन आल्यानं खळबळ, पोलिसांकडून चौकशी सुरू

Shardul Thakur: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली माझ्यासोबत अन्याय झाला! शार्दुल ठाकूरचा थेट आरोप; टीम इंडियाबाबत केला मोठा खुलासा

'तुझे केस विचित्र आहेत' ऑडिशनवेळी मंदार जाधवला दिलेलं रिजेक्शनचं विचित्र कारण, म्हणाला...

Amol Kolhe leaving Sharad Pawar : खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार?; 'महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू'

SCROLL FOR NEXT