sensex_2_1.jpg
sensex_2_1.jpg 
देश

शेअर बाजारात ‘ब्लॅक फ्रायडे’; सेन्सेक्स ६३४ अंशांनी घसरला

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई- अमेरिकी शेअर बाजारात गुरुवारी मोठी पडझड झाल्यामुळे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारातही मोठी घसरण झाली. सेन्सेक्स ६३४ अंशांनी घसरून ३८,३५७ वर, तर निफ्टी १९४ अंशांनी पडून ११,३३४ वर बंद झाला. सेन्सेक्समध्ये १.६३ टक्क्यांनी, तर निफ्टीमध्ये १.६८ टक्क्यांनी घसरण झाली.

सकाळी शेअर बाजार उघडला, तेव्हाच तो कमकुवत दिसत होता. त्यानंतर संपूर्ण बाजारात विक्रीचेच चित्र दिसून आले. यामध्ये मेटल, रिअल इस्टेट, आयटी, फार्मा, एफएमसीजीमध्ये सर्वांधिक पडझड झाली. फक्त मारुती सुझुकीच्या शेअरमध्ये वाढ झाली. बॅंकिंग क्षेत्रातही मोठी घसरण पाहायला मिळाली. यामध्ये ॲक्सिस ४.१६ टक्के, एसबीआय ३.०७ टक्के, आयसीआयसीआय बॅंकेच्या शेअरमध्ये २.६६ टक्क्यांनी घसरण झाली.

कंगनाची बाजू घेत राष्ट्रीय महिला आयोगाचा शिवसेनेवर निशाणा

निफ्टी ११,३०० अंशांवर बंद झाला आहे, त्यामुळे अजूनही बाजारात तेजी येण्याची शक्यता आहे. बाजार आणखी खाली गेला असता, तर अजून पडझड होण्याची शक्यता होती.

अमेरिकेत सध्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. त्याचा प्रभाव अमेरिकी शेअर बाजारावर होत आहे. भारतीय शेअर बाजारावरही अमेरिकी शेअरबाजारीत घडामोडींचे परिणाम दिसून येत आहेत. तसेच कोरोनामुळे बिघडलेल्या परिस्थितीमुळे तेथील आयटी क्षेत्रातील शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री चालू आहे, याचा जगभरातील शेअर बाजारावर वाईट परिणाम दिसत आहे.

निफ्टीमध्ये घसरण दर्शवणारे शेअर

अ‍ॅक्सिस बँक, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, एसबीआय, एनटीपीसी, इंडसइंड बँक, डॉ. रेड्डीज लॅब, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, अदानी पोर्टस, हिंदाल्को, कोटक महिंद्रा बँक.

अ‍ॅक्सिस बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक, पीएनबी, बंधन बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा बँक, एसबीआय, फेडरल बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, आरबीएल बँक.

निफ्टीतील ४९ शेअरमध्ये घसरण

निफ्टीतील ५० पैकी ४९ शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली, तर सेन्सेक्समधील ३० पैकी २८ शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Health Care : भरपूर खाऊनदेखील भूक लागते? असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

CSK vs SRH : बाळ येतंय, मॅच लवकर संपव...! SRH विरुद्धच्या सामन्यादरम्यान साक्षीने धोनीला का केली स्पेशल रिक्वेस्ट?

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

SCROLL FOR NEXT