Zhang Hong
Zhang Hong Sakal
देश

अंध गिर्यारोहकाने एव्हरेस्ट केले सर

पीटीआय

काठमांडू/नवी दिल्ली - जगातील सर्वात उंच शिखर एव्हरेस्ट शिखर (Everest Mountain) सर करण्याचे स्वप्न लाखो गिर्यारोहक (Trekking) बाळगून असतात. कोणत्या ना कोणत्या कारणाने अपंगत्व आलेले नागरिक, गिर्यारोहक देखील एव्हरेस्ट सर करण्याची इच्छाशक्ती बाळगून असतात. या जोरावरच चीनचे ४६ वर्षीय झांग होंग (Zhang Hong) यांनी माउंट एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केले असून ते अंध (Blind) आहेत. एव्हरेस्टरवर जाणारे ते जगातील तिसरे तर आशियातील पहिले अंध गिर्यारोहक ठरले. (Blind Climber Climbed Everest Success)

झांग यांनी गेल्या आठवड्यात एव्हरेस्ट शिखरावर चढाई केली. त्यांच्या-समवेत तीन मार्गदर्शक होते. चीनच्या दक्षिण पश्‍चिम शहर चोंगकिंग येथे जन्मलेले झांग होंग यांना ग्लुकोमामुळे वयाच्या २१ व्या वर्षी दृष्टी गमवावी लागली. दृष्टी गेल्यानंतरही त्यांची जिद्द कायम होती आणि त्यांनी ८८४९ मीटर उंचीचे शिखर गाठले. गिर्यारोहक होंग यांनी दृष्टिहीन अमेरिकी गिर्यारोहक एरिक वेहेनमेयर यांच्यापासून प्रेरणा घेत माउंट एव्हरेस्ट वर चढाई करण्याचा निर्णय घेतला. वेहेनमेयर यांनी २००१ मध्ये माउंट एव्हरेस्टवर चढाई केली होती. गिर्यारोहक होंग यांनी मित्र कियांग यांच्यासमवेत प्रशिक्षण घेतले होते.

चढाई करताना भयभीत होतो

गियारोहक झांग म्हणाले की, एव्हरेस्टवर मोहीम सुरू केली, तेव्हा मी भयभीत झालो होतो. कारण मी कोठे आणि कसा जात आहे, हे काहीच समजत नव्हते. सतत मी अडखळत होतो. अनेक ठिकाणी पडलो देखील. हा प्रवास कठीण असला तरी या आव्हानांचा सामना नक्की करू, असे ठरवले होते. गिर्यारोहणामध्ये आव्हाने आणि धोके असतातच आणि यातच खरे कौशल्य पणाला लागते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha : बारामतीत लेकीचं पारडं जड, सुनेत्रा पवार पिछाडीवर तर सुप्रिया सुळे आघाडीवर, ३४३ चा फरक

India Lok Sabha Election Results Live : मोदींनी पुन्हा घेतली आघाडी! पण अमेठीमधून भाजपला मोठा धक्का, स्मृती इराणी इतक्या हजार मतांनी पिछाडीवर

Maharashtra Lok Sabha Election Results Live : मावळ लोकसभा मतदारातून बारणे यांना १६ हजार मतांची आघाडी

Nagpur Crime : चिमुकलीची हत्या करणाऱ्याला तिहेरी फाशी; तिहेरी फाशीचे पहिलेच प्रकरण

Gold Price Today: आज सोने पुन्हा झाले स्वस्त; लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर सोन्यात मोठी घसरण

SCROLL FOR NEXT