BMTC Volvo Bus Accident ESakal
देश

Viral Video: व्होल्वो बसचा कहर! अचानक ब्रेक निकामी, चालकाचं नियंत्रण सुटलं, वाहनांना धडक अन्... थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

BMTC Volvo Bus Accident: बेंगळुरूमधील हेब्बल उड्डाणपुलावर बीएमटीसी व्होल्वो बसने एकाच वेळी अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात दोन दुचाकीस्वार जखमी झाले असून अनेक वाहने आणि मोटारसायकलचे नुकसान झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

बेंगळुरू: कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये एक मोठा अपघात झाला आहे. बेंगळुरूमधील हेब्बल फ्लायओव्हरवर बीएमटीसीच्या व्होल्वो बसने अनेक वाहनांना धडक दिली. अनियंत्रित बस अनेक वाहनांना धडकली आणि ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या अपघातात दोन दुचाकीस्वार जखमी झाले असून अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. बसचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली होती. तसेच घटना घडताच बघ्यांची गर्दी जमली होती. या घटनेतील जखमींवर उपचार सुरू आहेत. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये फ्लायओव्हरवर जाम असल्याचे दिसून येत आहे.

अपघात नेमका कसा घडला?

ही घटना 12 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 च्या सुमारास घडली. हेब्बल उड्डाणपुलाजवळ व्होल्वो बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. बस रस्त्यावरून जाणाऱ्या बाईक आणि कारला धडकली. बस चालकाने प्रथम दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यानंतर त्याने आणखी अनेक वाहनांना धडक दिली. बस एका कारसमोर थांबली. कारमधील प्रवासी थोडक्यात बचावले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. तसेच ही संपूर्ण घटना बसमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बसचा चालक ब्रेक लावण्याचा प्रयत्न करत होता, मात्र बसचे ब्रेक झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

या प्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत दुचाकीस्वाराच्या पायाला दुखापत झाली आहे. बसचा वेग जास्त नसल्यामुळे मोठा अपघात टळल्याचे त्यांनी सांगितले. या अपघातात दोन दुचाकीस्वार जखमी झाले असून अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. व्हिडिओमध्ये बस कंडक्टर ड्रायव्हरच्या सीटकडे धावताना आणि हातवारे करून ब्रेक का लावत नाही असे विचारताना दिसत आहे. बसचे विंडशील्ड तुटले. घटनेचा पुढील तपास सुरू आहे. ड्रायव्हरने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला होता पण ब्रेक लावता आला नाही असे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar News: V.K. सिंह यांचं अंडरवर्ल्डशी संबंध, मिटकरींकडे कोणते पुरावे?

Gas Shortage: 'एचपी गॅस'कडून निवेदन; देशात गॅसची काय परिस्थिती? स्पष्ट सांगितलं

राजघराण्याशी संबंध, अनुभवी राजकारणी, भाजपचा प्रमुख चेहरा अन्...; महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मांचा राजकीय प्रवास काय?

Horoscope News : उद्या 11 मार्च बुधादित्य योगामुळे 6 राशींना मिळणार विशेष लाभ ! नव्या संधी आणि आर्थिक लाभ

महाराष्ट्रात महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! प्रसूती रजा वाढवली; अतिरिक्त अर्ध-पगारी सुट्टीही मिळणार, किती दिवसांची?

SCROLL FOR NEXT