Varanasi Boat Accident esakal
देश

Boat Accident : अहिल्याबाई घाटातील गंगेत 34 पर्यटकांनी भरलेली बोट बुडाली; घटनास्थळी पोलीस, NDRF दाखल

अपघात होत असल्याचं पाहून नियम न पाळणारा बोटचालक घटनास्थळावरून पळून गेला आहे.

सकाळ डिजिटल टीम

अपघात होत असल्याचं पाहून नियम न पाळणारा बोटचालक घटनास्थळावरून पळून गेला आहे.

वाराणसी : जिल्हा प्रशासनाचा हलगर्जीपणा पर्यटकांच्या जिवाशी आला आहे. दक्षिण भारतातील 34 पर्यटकांना (Tourists) घेऊन जाणारी एक ओव्हरलोड बोट शनिवारी सकाळी गंगेत बुडाली आहे.

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटींग करत असताना या अपघातात बोटीतील सुमारे 34 जण बुडाले. ही माहिती समजताच एनडीआरएफ (NDRF) आणि पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. दरम्यान, स्थानिक लोकांच्या मदतीनं सर्व पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

अपघातानंतर आरडाओरडा सुरु होताच लोक आपापल्या साधनांसह बचावासाठी घटनास्थळी पोहोचू लागले. पर्यटकांना एक-एक करून वाचवण्याची प्रक्रिया सुरू झाली, तोपर्यंत दोघांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. अपघात होत असल्याचं पाहून नियम न पाळणारा बोटचालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवून कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी सुरु केलीय.

वाराणसीमध्ये आज (शनिवार) सकाळी सातच्या सुमारास अहिल्याबाई घाटासमोर (Ahilyabai Ghat) प्रवाशांनी भरलेली बोट अचानक बुडू लागल्यानं मोठा अपघात झाला. गंगेत बोट बुडाल्याची माहिती समजल्यानंतर एकच गोंधळ उडाला. आरडाओरडा सुरु झाल्यानंतर स्थानिक बोटीसह पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं. या दुर्घटनेतील दोघांची प्रकृती गंभीर असल्यामुळं त्यांना तातडीनं कबीर चौरा विभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP नेत्यांचा मोठा विजय! आंदोलनाला वेग; अखेर अभिजीत दिपके यांच्यासह तिघांची सुटका, आता सर्वोच्च न्यायालयात काय घडणार?

Navratri 2026 Wishes in Marathi: 'उदे ग अंबे उदे'... नवरात्रीनिमित्त व्हॉट्सॲपवर शेअर करा देवी दुर्गेच्या आशीर्वादाचे हे सुंदर शुभेच्छा संदेश

Maharashtra Live News :सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाला सुरुवात...

IND vs WI 3rd T20: इंदूरमध्येही आज बॅट विरुद्ध बॅट? दुसऱ्या सामन्यात ५०१ धावांचा पाऊस, आता तिसऱ्या टी-२०मध्येही फलंदाजांचे वर्चस्व राहणार?

Madhya Pradesh: अकराशे विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप; टीबी रुग्णांना ८ किलोची पोषण आहाराची टोपली

SCROLL FOR NEXT