Boat Sank In Uttar Pradesh Boat Sank In Uttar Pradesh
देश

Boat Sank : उत्तर प्रदेशात मोठा अपघात; यमुनेत ३० जण बुडाले, चौघांचे मृतदेह सापडले

रक्षाबंधनानिमित्त बोटीवर मोठ्या संख्येने महिला आणि लहान मुले असल्याचे सांगण्यात येत आहे

सकाळ डिजिटल टीम

Boat Sank In Uttar Pradesh बांदा : उत्तर प्रदेशातील बांदा येथे गुरुवारी (ता. ११) दुपारी बोटीचा मोठा अपघात झाला. मार्का पोलिस ठाण्याच्या हद्दीत यमुना नदीच्या मध्यभागी बोट बुडाली (Boat Sank). बोटीत ३० हून अधिक लोक होते. आठ जण कसेतरी पोहत निघाले. बोट आणि बाकीचे लोक सापडले नाहीत. स्थानिक गोताखोरांसह एसडीआरएफच्या पथकांना नागरिकांच्या शोधासाठी तैनात केले आहे. आतापर्यंत चार जणांचे मृतदेह (death) सापडले आहेत.

मार्कापासून फतेहपूर, प्रयागराजपर्यंत लोक यमुना नदी पार करतात, असे सांगितले जात आहे. एकमेव साधन म्हणजे बोट आहे. बोटीत ३० ते ४० लोक नदीच्या एका काठावरून दुसऱ्या बाजूला नेले जातात. रक्षाबंधनानिमित्त बोटीवर मोठ्या संख्येने महिला आणि लहान मुले असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी अपघाताची दखल घेतली आहे. योगी यांनी अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले आहे.

गुरुवारी दुपारी ३० हून अधिक जण मार्का येथून बोटीने फतेहपूरकडे जात होते. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे बोट मध्यभागी अनियंत्रित होऊन उलटली (Boat Sank). यानंतर बोटीतील सर्वजण बुडाले. राजकरण पासवान (२८, रा. असोधर बारूई फतेहपूर) व गया प्रसाद निषाद (६०, रा. समगारा बाबेरू) हे पोहून नदीतून बाहेर निघाले. माहिती मिळताच डीएम, एसपी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

सोसाट्याच्या वाऱ्याने बोट बुडाली

सुमारे ३० ते ३५ जणांना घेऊन ही बोट फतेहपूर जिल्ह्यातील जरौली घाटाकडे जात होती. नदीत मध्यभागी पोहोचताच जोरदार वाऱ्याने बोट उलटली, असे पोलिस अधीक्षक अभिनंदन यांनी सांगितले. आतापर्यंत चार जणांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले आहेत. त्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुमारे आठ जण पोहत बाहेर आले तर किमान २० जण बेपत्ता आहे, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. गोताखोरांच्या मदतीने बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Accident: कल्याणमध्ये भीषण अपघात, टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक; एकाचा मृत्यू

"दारूमुळे नाटक इंडस्ट्री बरबाद झाली" अभिनेते सुनील तावडेंनी व्यक्त केली खंत "मी अत्यंत तिरस्कार..."

Mumbai Indians Playing XI: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात 'तगडा' खेळाडू दाखल, मात्र निर्माण झालाय गोंधळ; कोण IN, कोण OUT?

हेमंत ढोमेच्या सिनेमात सेमच स्टारकास्ट दिसते... इंडस्ट्रीतल्या गटबाजीवर श्वेता शिंदेचं स्पष्ट मत, म्हणते- माझी मुलगी जर...

एक्सपायरी संपलेली बिस्किटं अन् कोल्डड्रिंक्सवर नवीन तारीख लावून विक्री, तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT