देश

‘देहदान हेच श्रेष्ठदान’; देहदान करताना काय लक्षात ठेवाल?

केतन पळसकर

नागपूर : ‘देहदान हेच श्रेष्ठदान’ असे जनजागृती करणारे वाक्य आपल्या अनेक वेळा वाचनात येतात. मात्र, हा संकल्प करताना कुठली प्रक्रिया अवलंबली जाते, याची फारशी माहिती इच्छुकांना मिळत नाही. मरणोत्तर देहदानासाठी संबंधित संस्था किंवा मेडिकल कॉलेजच्या विनंती अर्जानंतर स्वेच्छापत्र तयार होते आणि ही प्रक्रिया सुरू होते.

मेडिकल कॉलेजमध्ये देहदान समिती स्थापन करण्यात आली आहे. इच्छापत्र भरून दिल्यावर या विभागाव्दारे नोंदणीपत्र व क्रमांक, संबंधित डॉक्टर्सचे टेलिफोन नंबर, आयबँक आदींची माहितीही दिली जाते. अर्थातच सर्व वारस आणि नातेवाइकांच्या संमतीनेच हे स्वेच्छापत्र भरले जाते. मरणोत्तर देहदान प्रक्रिया मृत्यू पश्चात सहा तासांत होणे आवश्यक असते.

अभ्यासासाठी पार्थिवाचा अनेक महिने उपयोग व्हावा म्हणून मेडिकलमध्ये फॉर्मेलीन इंजेक्शन प्रक्रिया केली जाते. तसेच फक्त नैसर्गिक मृत्यू झाल्यास देहदान करता येत. एड्स, सार्स, कावीळ, नुकतेच ऑपरेशन झालेले मृत शरीर, अनेक वर्ष अंथरुणाला खिळून असलेल्या व्यक्तीचे शरीर यासाठी चालत नाही.

जिवंतपणी करता येणारे आणि मृत्युपश्चात केले जाणारे असे दोन प्रकारचे अवयवदान असते. ब्रेनडेड पेशंटच्या अवयवांचेही दान होते. जिवंतपणी करता येणारे रक्त, त्वचा, यकृत व अस्थीमज्जेचा काही भाग, दोन मूत्रपिंडांपैकी एका मूत्रपिंडाचे दान आदी केले जाते. मृत्यूनंतर नेत्रदान व त्वचादान केले जाते. ब्रेन डेड म्हणून घोषित केल्यानंतर नेत्र, त्वचा, अस्थी, अस्थिमज्जा, रक्तवाहिन्या, हृदय, फुप्फुस, यकृत, स्वादुपिंड, मूत्रपिंड यांचे दान होऊ शकते.

कोमातून पेशंट बाहेर येऊ शकतो. कोमात गेलेल्या पेशंटचे अवयव प्रत्यारोपणासाठी घेतले जात नाहीत. मृत्यूनंतर दोन ते चार तासांमध्ये नेत्रदान होणे आवश्यक असते. नेत्रदात्याच्या मृत्यूनंतर त्वरित जवळच्या नेत्रपेढीला कळविणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीने मृत्यूपूर्वी नेत्रदानाचे प्रतिज्ञापत्र भरले नसले तरीही वारसदार व्यक्ती मृत व्यक्तीचे नेत्रदान करू शकतात.

१९८२ सालापासून मी ७५० इच्छुक देहदात्यांचे स्वेच्छापत्र तयार केले आहेत. त्यापैकी आजवर २५० पार्थिव मेडिकल कॉलेजला दान करण्यात आले आहेत. मृत्यूनंतर नातेवाइकांनी शासकीय देहदान समितीच्या सदस्यांशी संपर्क साधावा. इच्छुकाचा बाहेरगावी मृत्यू झाल्यास तेथील वैद्यकीय महाविद्यालयात सुद्धा देहदानाची प्रक्रिया करता येते.
- रमेश सातपुते, सदस्य, शासकीय देहदान समिती

देह स्वीकारणारे वैद्यकीय महाविद्यालय

  • इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो)

  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल)

  • एन. के. पी. साळवे मेडिकल कॉलेज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सने १८ वर्षीय नाशिकच्या पोराला दिली पदार्पणाची संधी; ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकलेय वादळी शतक, Video

ST Bus: एसटी प्रवासी-चालकांचे हाल! डिझेल तुटवड्यामुळे उत्पन्नातही घट; बीपीसीएलचा करारही संपला

Jalgaon Temperature : उष्‍णतेच्‍या झळा अधिक तीव्र! सात वर्षांनंतर एप्रिलमध्‍ये पारा ४४ अंशांवर, पुढील दोन दिवस झळा कायम

Akola Exam : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिका घोटाळ्याने विद्यार्थ्यांचा संताप

Ice Cream and Chocolate Rate: चॉकलेट-आइसक्रीम महागणार! अनेक ब्रँड्स किंमती वाढवणार; किती रुपयांनी? जागतिक संकटाचा भारतावर परिणाम

SCROLL FOR NEXT