body of man who died on road taken in garbage van over virus fire at uttar pradesh 
देश

कचरागाडीतून नेला मृतदेह; व्हिडिओ व्हायरल...

वृत्तसंस्था

लखनौ (उत्तर प्रदेश) : एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह कचरा वाहणाऱया गाडीतून पोलिस ठाण्यात नेण्यात आला. संबंधित घटना मोबाईलमध्ये कैद करून, सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

बलरामपूरमधील रहिवासी मोहम्मद अन्वर (वय 42) हे स्थानिक सरकारी कार्यालयात कामानिमित्त गेले होते. त्यावेळी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच ते कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. ते रस्त्यावर पडत असल्याचा व्हिडिओ चित्रित झाला आहे. त्यानंतर त्याठिकाणी पोलिस आणि महापालिकेचे कर्मचारी आले. त्याचेही व्हिडिओ चित्रीकरण व्हायरल झाले आहे. त्यामध्ये बाजूला रुग्णवाहिला उभी असल्याचे दिसत आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मृताला कोरोना असल्याच्या शक्‍यतेने रुग्णवाहिकेत घेण्यास नकार दिला. त्यानंतर महापालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांनी मृतदेह कचऱ्याच्या गाडीत ठेवला. यावेळी पोलिस कर्मचारी उपस्थित होते. संबंधित घटनेच मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीकरण झाले असून, हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बलरामपूरचे पोलिस अधीक्षक देवरंजन वर्मा यांनी या घटनेला "अमानवीय आणि असंवेदनशील' म्हटले आहे. तसेच या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

देवरंजन वर्मा म्हणाले, 'कोरोना महामारीच्या घाईत काही जणांनी माणुसकीहीन वृत्तीचे दाखविली आहे. संबंधित व्यक्तिला कोरोनाचा संसर्ग असता तरी, पीपीई सूट घालून त्याचा मृतदेह कर्मचारी उचलून नेऊ शकले असते. परंतु, पोलिस आणि महापालिका कर्मचाऱ्यांनीही चुकीची कृती केली आहे. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर योग्य कारवाई होईल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS 3rd T20I : अर्शदीपने सुरुवात दणक्यात करून दिली, पण सूर्याची रणनीती फसली; टीम डेव्हिड, स्टॉयनिसने वाट लावली

Crime: संतापजनक! आधी २७ दिवसांच्या बाळाला संपवलं, नंतर पत्नीकडून पतीच्या गुप्तांगावर वार, धक्कादायक कारण समोर

Hidden Camera: हॉस्टेल अन् PG रूममधील हिडन कॅमेरा कसे चेक कराल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप पद्धत

Nashik News : जगभरातील नाण्यांचा खजिना नाशिकला! डॉ. सुनीता पाठक यांची मविप्रच्या संग्रहालयाला अनमोल भेट

Nashik Municipal Election : नाशिक मनपा निवडणूक: नव्या नियमानुसार ओबीसीची एक जागा घटली; सर्वसाधारण खुल्या गटाला फायदा

SCROLL FOR NEXT