Pune Crime News sakal
देश

Crime News: धक्कादायक! लॅपटॉप बॅगमध्ये आढळला चिमुरडीचा मृतदेह, 2 दिवसांपासून...

दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या दोन वर्षांच्या मुलीचा मृतदेह शेजारच्या खोलीत हॅन्गरला लटकलेल्या लॅपटॉपच्या बॅगमध्ये सापडला

अंकिता खाणे (Ankita Khane)

ग्रेटर नोएडा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका गावामधून दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या दोन वर्षांच्या मुलीचा मृतदेह शेजारच्या खोलीत हॅन्गरला लटकलेल्या लॅपटॉपच्या बॅगमध्ये सापडल्यामुळे खळबळ उडाली. (Crime News in Marathi)

घरातून दुर्गंधी येत असताना लोकांनी कुलूप तोडले असताना हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. बलात्कारानंतर मुलीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची तीन पथके तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडा येथील चंदौली जिल्ह्यातील एका गावात एक जोडपं आपल्या दोन वर्षांची मुलगी आणि सात महिन्यांच्या मुलासह राहतात. दोघेही खासगी कंपनीमध्ये काम करतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे वडील 7 एप्रिल रोजी कामावर गेले होते. (Latest Marathi News)

दोन्ही मुलांना घरी ठेवून आई काही वस्तू आणण्यासाठी बाजारात गेली होती. दरम्यान, मुलगी संशयास्पद परिस्थितीत बेपत्ता झाली. नातेवाइकांनी मुलीचा खूप शोध घेतला, मात्र तिचा काहीही पत्ता लागला नाही. मुलीच्या वडिलांनी रात्री 11 वाजता सूरजपूर पोलीस चौकीला घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद करून शोध सुरू केला.

नातेवाइकांनीही मुलीचा शोध घेतला, मात्र तिचा कुठेच काहीच पत्ता लागला नाही. बलियाचे रहिवासी राघवेंद्र हा देखील पीडित कुटुंबियांच्या शेजारच्या खोलीत राहतो. रविवारी सकाळी त्यांच्या खोलीतून दुर्गंधी येऊ लागली. संशयावरून शेजाऱ्यांनी खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. नातेवाइकांनी आत पाहिले की, एक लॅपटॉप बॅग हॅन्गरला लटकत होती आणि त्यातून दुर्गंधी येत होती.

बॅगेतून रक्तही वाहत होते. यानंतर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बॅग उघडली तेव्हा सगळ्यांना धक्का बसला. एका निष्पाप मुलीचा मृतदेह बॅगेत भरून ठेवला होता.

पोलिसांनी सांगितले की, पीडित कुटुंबियांच्या शेजारी राघवेंद्र एका खासगी कंपनीत काम करतो. त्याची पत्नी व दोन मुले गावी गेली आहेत. स्थानिकांनी सांगितले की, मृत मुलगी त्याला काका म्हणायची. हा आरोपी कुटुंबीयांसह दोन दिवस मुलीच्या शोधात त्यांना मदत करत होता. मृतदेह त्याच्या खोलीत असल्याचे कोणालाच कळले नाही. त्याच्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याची चर्चा सुरू होताच तो पळून गेला.

पोलिसांनी सांगितले की, हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. ज्याच्या खोलीतून मृतदेह सापडला आहे. परंतु तो फरार आहे. त्याच्या अटकेनंतर हत्येचे कारण समजू शकेल. बलात्कारानंतर मुलीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: प्रेयसीचा मॅसेज आला अन् भेटायला गेला …; काही तासांतच आईला फोन, प्रेमसंबंधातून तरूणाला संपवलं, कोथरूडमध्ये काय घडलं?

LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

SCROLL FOR NEXT