Bomb in ST anonymous letter stirs excitement at station inspection by BDDS dog squad Sakal
देश

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

शहरातील बारा आणि ग्रामीण भागातील चार शाळांना हे धमकीचे ईमेल पाठवण्यात आले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

अहमदाबाद : उद्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान देशभरात पार पडणार आहे. यापार्श्वभूमीवर गुजरातच्या अहमदाबादमधील १६ शाळांना बॉम्बनं उडवण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे. यामध्ये शहरातील १२ तर ग्रामीण भागातील ४ शाळांचा समावेश आहे.

सोमवारी या शाळांना धमकीचे ई-मेल आल्यानं खळबळ उडाली आहे. पोलिसांचंही यामुळं चांगलचं धाबं दणाणलं आहे. (bomb hoax threat email for 16 schools in Ahmedabad Gujarat ahead of loksabha polling)

अहमदाबादचे पोलीस सहआयुक्त शरद सिंघल यांनी सांगितलं की, अहमदाबाद शहरातील १२ शाळा आणि अहमदाबाद ग्रामीण भागातील ४ मतदारसंघातील शाळांना सकाळी ६ वाजता ई-मेल प्राप्त झाले. रशियन डोमेनवरुन त्यांना हे ईमेल आले आहेत. 'mail.ru' असं हे डोमेन आहे.

ई-मेलमध्ये काय म्हटलं?

ईमेलमधून शाळांना धमकी देण्यात आली होती. "तुमच्या शाळेमध्ये बॉम्बस्फोट होणार आहे" असा मजकूर या ईमेलमध्ये आहे. (Latest Marathi News)

सुरक्षा रक्षक अलर्टवर

या ईमेलची गंभीर दखल घेत पोलिसांनी ज्या शाळांना हे ईमेल आले तिथं कोंबिंग ऑपरेशन राबवलं. पण यामध्ये काहीही आक्षेपार्ह आढळून आलेलं नाही. त्यामुळं हा धमकीचा ई-मेल म्हणजे अफवा होती हे स्पष्ट झालं आहे. असाच मिळताजुळता मजकूर असलेले ईमेल १ मे रोजी दिल्लीतील १५० शाळांना आले होते. त्यावेळीही तपासात काहीही निष्णन्न झालं नव्हतं.

दरम्यान, अहमदाबादचे पोलीस याच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला आहे. त्याचबरोबर सायबर क्राईम विभागात या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : इथे कशाला टाईमपास करतोस? राज ठाकरेंनी पिट्याभाईला झापलं, मनसेच्या पुण्यातील बैठकीची Inside Story

Viral Video: दुकानात केळी पाहून छोट्या हत्तीला पडली भुरळ पण आईने तिथेच दिली चांगुलपणाची शिकवण, व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक

Parth Pawar : पार्थ पवार यांच्यावर १८०० कोटींच्या जमीन घोटाळ्याचे आरोप; मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले चौकशीचे आदेश, तहसीलदाराचे निलंबन

AUS vs IND, 4th T20I: दुसऱ्या चेंडूवर झेल सुटला, मग अभिषेक शर्मा बरसला; पण ऍडम झाम्पाला षटकारानंतर काटा काढला

T20I World Cup 2026: नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आणखी एक वर्ल्ड कप फायनल; पाच शहरांमध्ये होणार सामने...

SCROLL FOR NEXT