Delhi 
देश

मोठी बातमी! दिल्लीतील दोन सरकारी हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याचा ई-मेल; सर्च ऑपरेशन सुरू

Bomb threat email : बुरारी सरकारी हॉस्पिटल आणि मंगोलपुरीमधील संजय गांधी हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- देशाची राजधानी दिल्लीमध्ये दोन सरकारी हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंबंधी ई-मेल मिळाला आहे. एएनआयने यासंदर्भातील बातमी दिली आहे. बुरारी सरकारी हॉस्पिटल आणि मंगोलपुरीमधील संजय गांधी हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्लीतील अनेक पब्लिक स्कूल्सना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर आज दोन हॉस्पिटल्सना बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलच्या माध्यमातून मिळाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दिल्ली पोलीस घटनास्थळी पोहोचले असून सर्च ऑपरेसन युद्ध पातळीवर सुरु आहे.

काही मिडिया रिपोर्टनुसार, बॉम्बने उडवून देण्याची धमकी हॉस्पिटलच्या ई-मेल आयडीवर आली होती. त्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांच्यासोबत बॉम्ब स्कॉड, आपात्कालीन विभागाचे कर्मचारी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. हॉस्पिटलच्या सर्व परिसराची तपासणी सुरु झाली आहे.

डीसीपी मनोज मीणा म्हणाले की, माहिती मिळतात बॉम्ब स्कॉड घेऊन अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. आतापर्यंत काहीही संशयास्पद सापडलेलं नाही. पोलिसांना दुपारी ३ वाजून १७ मिनिटांनी ही माहिती मिळाली होती. पहिला फोन बुराडी हॉस्पिटलमधून आला होता. त्यानंतर दुसरा फोन ४ वाजून २६ मिनिटांनी संजय गांधी हॉस्पिटलमधून आला. सुरुवातीला हॉस्पिटलमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. सध्या परिस्थिती आटोक्यात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT