bommai continues legal efforts issue of reservation for obc in local body elections sakal
देश

ओबीसी आरक्षण निश्‍चितीसाठी न्यायालयात जाणार: बोम्मई

अस्तित्वात असलेल्या आरक्षणानुसार जाण्याची परवानगी मिळावी, अशीही न्यायालयाला विनंती करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असताना इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) आरक्षण निश्‍चित करण्यासाठी सरकार सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा विचार करत आहे, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी सांगितले. सध्या अस्तित्वात असलेल्या आरक्षणानुसार जाण्याची परवानगी मिळावी, अशीही न्यायालयाला विनंती करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

बोम्मई यांनी ओबीसी आरक्षणावर वेळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. बृहन बंगळूर महानगरपालिकाबाबतचे प्रकरण प्रलंबित आहे. दुसरे म्हणजे जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुकांबाबतही विनंती करायची आहे, की कायदेशीर व घटनात्मकरित्या ओबीसी आरक्षण द्यावे लागेल, असे बोम्मई म्हणाले. सरकारपुढे वेळ मागणे किंवा जुन्या ओबीसी आरक्षणानुसार संधी देण्याची विनंती करणे हे पर्याय असल्याचे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT