गुजरातमध्ये समाजशास्त्राच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमातल्या एका पुस्तकात आदिवासी समाजाबद्दल वादग्रस्त उल्लेख केल्याने प्रकाशकाला हे पुस्तक मागे घ्यावं लागलं आहे. काँग्रेसने या उल्लेखाबद्दल आक्षेप घेतल्याने प्रकाशकाने माफी मागितली आहे. प्रकाशकाने आपल्या संकेतस्थळावरून ही घोषणा केली आहे.
'कौटिल्य प्रश्नसंपुट' या पुस्तकाच्या खंडांचा भाग असलेलं हे पुस्तक समाजशास्त्राच्या (Sociology) द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी पुरवण्यात आलं आहे. वेश्याव्यवसाय हे एड्स प्रसारणाच्या प्रमुख कारणांपैकी एक असल्याचा उल्लेख यामध्ये आहे. पुस्तकात म्हटलं आहे की, शहरांमध्ये, गावांमध्ये आणि आदिवासी समाजात काळजी न घेता, नियंत्रण न ठेवता वेश्याव्यवसाय सुरू आहे. सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार, अनेक वेश्यांना एचआयव्ही एड्सची लागण झालेली आहे.
याबद्दल काँग्रेस प्रवक्ते मनिष दोशी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री (Gujrat Chief Minister) भुपेंद्र पटेल आणि शिक्षणमंत्री जितू वघानी यांना पत्र लिहीत हे पुस्तक मागे घेण्याची मागणी केली आहे. तसंच ठराविक समुदायातल्या महिलांचा अपमान केल्याप्रकरणी प्रकाशकावर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. दोशी यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, एड्सच्या प्रसाराची कारणे या धड्यामध्ये आदिवासी समाजाचा (Tribal Community) अपमान करण्याच्या भावनेने एक निराधार उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यात म्हटलं आहे की आदिवासी समाजामध्ये वेश्याव्यवसाय सर्रासपणे चालतो.
याप्रकरणी अहमदाबाद(Ahmadabad) इथले प्रकाशक आर जमनादास अँड कंपनी यांनी आपण पुस्तक मागे घेत असल्याची घोषणा आपल्या अधिकृत वेबसाईटवरून केली आहे. प्रकाशकांनी म्हटलं आहे की, आम्हाला समाजाच्या नेत्यांकडून माहिती मिळाली की समाजशास्त्राच्या कौटिल्य या पुस्तकामध्ये आदिवासी समाजाबद्दल असलेल्या काही माहितीमुळे समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही बाजारातून हे पुस्तक तात्काळ मागे घेत आहोत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.