corona vaccine sakal media
देश

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोसची मागणी

ओमिक्रॉनचा संभव्य धोका लक्षात घेता महाराष्ट्रात पुन्हा नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या (Omicron) संसर्गबाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून देशातील ओमिक्रॉनबाधितांची संख्या आता 358 च्या घरात पोहचली आहे. दरम्यान, ओमिक्रॉनमुळे देशात कोरोनाची तिसरी (Omicron Third Wave ) लाट येऊ शकते अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्याअनुशंगाने फ्रंट लाइन वर्कर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. (Booster Dose For Front Line Workers And Heath Workers)

ओमिक्रॉनचा (Omicron) संभव्य धोका लक्षात घेता गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली (PM Modi) यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यामध्येदेखील मोदी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा तिसरा डोस म्हणजचे बूस्टर डोस देण्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली असल्याचे म्हटले आहे. पार पडलेल्या बैठकीला नीती आयोगाचे (Niti Aayog) सदस्यदेखील उपस्थित होते. राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी १०० टक्के लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही केंद्रानं दिल्या आहेत. त्याचबरोबर वॉररुम पुन्हा सज्ज करा आणि कोविडच्या ट्रेन्ड्सच्या बदलाचं निरिक्षण करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लागू

देशातील सर्वाधिक ओमिक्रॉन बाधितांची संख्या महाराष्ट्रात असून भविष्यातील संभव्य धोका लक्षात घेता राज्यात पुन्हा नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच टास्क फोर्सची बैठक घेतली. त्यानंतर मोठा निर्णय घेण्यात आलाय. (Night Curfew in Maharashtra)

भारतात 60 टक्के पात्र नागरिकांचे लसीकरण पूर्ण

भारतातील 60 टक्क्यांहून अधिक पात्र नागरिकांना कोरोना (Corona Vaccine) लसीचे दोन्ही लसींचे डोस देऊन पूर्ण झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Union Health Minister Mansukh Mandaviya) यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी एक ट्वीट करत भारताचे अभिनंदन केले आहे. याशिवाय, भारतातील सुमारे 89 टक्के प्रौढांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला असल्याचे आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आले आहे. (Over 60 per cent of the eligible population is fully vaccinated In India.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

Maharashtra Latest News Update: माटुंगा पोलिसांच्या थरारक कारवाईत दरोड्यातील मुख्य आरोपी अटक

SCROLL FOR NEXT