देश

Indo-China Border:अरुणाचल प्रदेशमध्ये भारताने बांधला सर्वात लांब बोगदा, काही मिनिटात सैनिक पोहोचणार चीनच्या सीमेवर

हा बोगदा वापरात आल्यानंतर भारतीय सैनिकांना चीनच्या सीमेपर्यंत लवकर पोहोचणे शक्य होणार आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ने अरुणाचल प्रदेशात सेला बोगदा बांधला आहे.

Manoj Bhalerao

Tunnel in Arunachal Pradesh:अरुणाचल प्रदेशमध्ये जगातील सर्वात लांब बोगदा उघडला जाणार आहे. हा बोगदा भारतासाठी संरक्षणदृष्ट्या महत्त्वाचा आहे. हा बोगदा वापरात आल्यानंतर भारतीय सैनिकांना चीनच्या सीमेपर्यंत लवकर पोहोचणे शक्य होणार आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ने अरुणाचल प्रदेशात सेला बोगदा बांधला आहे. हा दुहेरी मार्गाचा बोगदा 13 हजार फूट उंचीवर आहे.

या प्रकरणाची माहिती असलेल्या अधिकार्‍यांच्या मते, यामुळे तवांगसारख्या उंच प्रदेशात पोहोचणे सोपे होईल. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन अरुणाचल प्रदेशमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्यात व्यस्त आहे, जेणेकरून चीनवर नियंत्रण ठेवता येईल.

700 कोटी रुपयांचा प्रकल्प

बळीपारा-चारडवार-तवांग रोडवरील 700 कोटी रुपयांच्या सेला बोगद्याच्या प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते फेब्रुवारी 2019 मध्ये करण्यात आली. नेचिफू टनेल या आणखी एका बोगद्याचे उद्घाटन पुढील आठवड्यात होणार आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर अधिकाऱ्यांनी सांगितले की, या बोगद्यामुळे पुढच्या मोर्चांशी संपर्कही साधता येईल. 500 मीटर लांबीचा हा बोगदा बीसीटी रस्त्यावर 5700 फूट उंचीवर पश्चिम कामेंग येथे बांधण्यात आला आहे. (Latest Marathi News)

अधिकाऱ्यांनी सांगितले की, पावसाळ्यात ढगफुटी आणि भूस्खलनामुळे अप्रोच रोड खराब झाल्याने सेला बोगदा प्रकल्प पूर्ण होण्यास थोडा विलंब झाला. ते आता पूर्णत्वास आले असून चार आठवड्यांत तयार होईल. आणखी एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, सेला बोगद्याच्या उद्घाटनासाठी संरक्षण मंत्रालय पीएम मोदींकडून वेळ मागणार आहे.

अतिशय महत्त्वाचा प्रकल्प

चीनच्या सीमेवर हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. याचे कारण म्हणजे, 14,000 फूट उंचीवर असलेल्या सेला खिंडीवरील तवांगशी हिवाळ्यातील कनेक्टिव्हिटी हे लष्करासाठी अनेक दशकांपासून मोठे आव्हान आहे. दरवर्षी तीन ते चार महिने येथे सैन्य, शस्त्रे आणि मालाच्या वाहतुकीवर मोठा परिणाम होतो.

नव्या बोगद्यामुळे तवांगला जाण्यासाठी लागणारा वेळ किमान एक तासाने कमी होईल. तसेच, लॉन्च झाल्यानंतर, सर्व सीझनमध्ये कनेक्टिव्हिटी राखली जाईल. लाईव्ह हिंदुस्तानला अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा बोगदा गेल्या वर्षी पूर्ण होऊन खुला होणं अपेक्षित होते. परंतु प्रदीर्घ थंडीमुळे बांधकामाचा वेग कमी होणं आणि बोगद्याच्या आत काँक्रीट उभारण्यास विलंब होणं या तांत्रिक बाबींमुळे तसे होऊ शकले नाही.(Latest Marathi News)

दोन टेकड्यांमधून जाणारा बोगदा

या प्रकल्पातील पहिला बोगदा ९८० मीटर लांबीचा आहे. तर, दुसरा बोगदा १५५५ मीटर लांब असून तो एक जुळ्या नळीचा बोगदा आहे. हे बोगदे सेलाच्या पश्चिमेला दोन टेकड्यांमधून जातात. या प्रकल्पामध्ये अनुक्रमे 7 किमी आणि 1.3 किमी लांबीचे दोन रस्ते देखील समाविष्ट आहेत. दुसऱ्या बोगद्यात वाहतुकीसाठी दोन-लेन ट्यूब आणि आणीबाणीसाठी एस्केप ट्यूब आहे.

त्यांच्या बांधकामात ५० हून अधिक अभियंते आणि ५०० बीआरओ कामगारांचा सहभाग होता. या लोकांनी ऑस्ट्रियन टनेलिंग तंत्राचा वापर करून सेला बोगदा बांधला आहे. बोगदा बनवताना खडक आणि खडकांच्या वर्तनाचे निरीक्षण देखील केले जाते.(Latest Marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

Shirur Crime : पुणे–अहिल्यानगर महामार्गावर थरार; शिरूरजवळ तरुणावर कोयता-तलवारीने जीवघेणा हल्ला!

SCROLL FOR NEXT