BoycottIndigo hashtag trending on twitter after Kunal Kamra and Arnab Goswami incident 
देश

#BoycottIndigo अर्णब गोस्वामींचा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या कुणालला इंडिगोनं केलं बॅन

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पत्रकार अर्णब गोस्वामी यांचा एक व्हिडिओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाला. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने तो व्हिडिओ विमानात शूट करून शेअर केलाय. यात कुणाल अर्णब यांना त्यांच्या पत्रकारितेविषयी सवाल करत आहे मात्र अर्णब त्याच्या कोणत्याही प्रश्नांचं उत्तर देत नाही. हा सर्व प्रकार इंडिगोच्या मुंबई ते लखनौ विमानात घडला. या सर्व प्रकरानंतर इंडिगो व एअर इंडिया या विमान कंपन्यांनी सहा महिन्यासांठी कुणालला विमान प्रवासाची बंदी घातली आहे. यावर सोशल मीडियावर कुणालच्या समर्थनार्थ #BoycottIndigo हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. 

कुणाल कामराने गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याच्या या वागणुकीमुळे अर्णब गोस्वामींसह इतर प्रवाशांनाही त्रास झाला. तसेच विमानातील इतर मदतनीससही हा वाद सोडवण्यासाठी मध्ये पडले नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावर इंडिगोवर चांगलंच तोंडसुख घेतलं जातंय. कुणाल कामरावर सहा महिन्यांची बंदी कशी घालू शकतात, असा सवाल इंडिगो व एअर इंडियाला नेटकरी करत आहेत. 

सोशल मीडियावर या बाबत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी #BoycottIndigo म्हणत इंडिगोवर बहिष्कार घातलाय, तर काहींनी कुणाल कामरावर बंदी घातली हे एक प्रकारे बरे केल्याची प्रतिक्रीया दिली आहे. 

फ्लाईटमध्ये नक्की काय घडलं?
कुणाल कामराने एका ट्विटमध्ये म्हटलंय की, लखनौला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये अर्णब गोस्वामी यांची भेट झाली. त्यांच्याशी बोलण्याचा माझा प्रयत्न होता. त्यांच्या पत्रकारितेविषयी माझी काही मतं आहेत. ती त्यांना सांगायची होती. त्यांनी माझ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. त्यावेळी त्यांनी मला मानसिक संतुलन बिघडलेला (mentally unstable) असा उल्लेख केला, असं कुणालनं म्हटलंय. हा व्हिडिओ शूट केल्याचा मला कोणताही खेद किंवा खंत नाही. या प्रकाराबद्दल विमानातील एक व्यक्तीसोडून सर्वांचे मी आभार मानले. मी केलेलं कोणतंही कृत्य गुन्हेगारी स्वरूपाचं आहे, असं मला वाटत नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT