A detailed view of the court premises where senior lawyer Rakesh Kishor was reportedly assaulted after the shoe-throwing incident involving former Chief Justice B. R. Gavai.

 

esakal

देश

lawyer Rakesh Kishor assaulted in Court Video : माजी सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकणाऱ्या वरिष्ठ वकिलास न्यायालयाच्या आवारातच चपलेने मारहाण!

Adv. Rakesh Kishor Latest news : एवढंच नाहीतर यावेळी ढकलाढकलीही झाली. अखेर घटनास्थळी उपस्थित न्यायालयाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करत मोठ्या प्रयत्नांनी राकेश किशोर यांना बाहेर नेले.

Mayur Ratnaparkhe

Delhi court premises incident : सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर बूट फेकणारे वकील राकेश किशोर यांना दिल्लीच्या कड़कड़डूमा न्यायालय परिसरात काही वकिलांनी  चपलांनी मारहाण केली. या घटनेमुळे न्यायालय परिसरात खळबळ उडाली असून, घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

खरंतर माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी त्यांच्यावर बूट फेकून न्यायालयात गोंधळ घालणारे वकील राकेश किशोर यांना माफ केलेलं आहे. मात्र, काही वकिलांनी न्यायालय संकुलातच वकील राकेश किशोर यांना चपलांनी मारहणा केल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा वर आलं आहे.

राकेश किशोर न्यायालयात उपस्थित असताना ही घटना घडली. काही वकिलांनी त्यांना चपलेने मारहाण केली. एवढंच नाहीतर यावेळी ढकलाढकलीही झाली. अखेर घटनास्थळी उपस्थित न्यायालयाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करत मोठ्या प्रयत्नांनी राकेश किशोर यांना बाहेर नेले.

खरंतर बी.आर.गवई यांच्यावर बूट फेकल्यानंतर राकेश किशोर यांना बार कॉन्सिलने निलंबित केलेले आहे. मोठ्याप्रमाणात टीका होत असतानाही, राकेश किशोर यांनी सांगितले की त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही. त्यांनी सांगितले की देव त्यांना स्वप्नात दर्शन देऊन असे करण्याची सूचना देतो.

राकेश किशोर हे २००९ पासून दिल्लीच्या बार कॉन्सिलमध्ये नोंदणीकृत एक वरिष्ठ वकील आहेत. त्यांचे वय अंदाजे ७२ वर्षे आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाने त्यांच्या निलंबनानंतर, पुढील कारवाई होईपर्यंत ते कोणत्याही खटल्याचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goa Nightclub Fire Update : लुथरा बंधू थायलंडमधून पळून जाऊ शकणार नाहीत, भारत सरकारने रद्द केला पासपोर्ट

Koyna Earthquake: कोयनेतील ‘त्या’ काळरात्रीला ५८ वर्षे पूर्ण! 'भूकंपाच्या आठवणी आजही कायम'; निसर्गाच्या उद्रेकामुळे शेकडोंनी गमावले होते प्राण..

Latest Marathi News Live Update : कोर्टात सुनावणीला सातत्याने गैरहजर राहिल्यामुळे बच्चू कडू यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी

Pune News : राज्य सहकारी बँकेत शिपाई, चालक भरतीही आयबीपीएसमार्फत

Sahyadri Tiger: 'ताडोबातील आणखी एक वाघीण सह्याद्रीत'; आईपाठोपाठ मुलीचेही स्थानांतर, चांदोलीच्या सोनरलीत वास्तव्य !

SCROLL FOR NEXT