brahmos
brahmos 
देश

सीमेवर तणाव असताना ब्रह्मोसच्या एँटी-शीप व्हर्जनचे यशस्वी परिक्षण

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतीय सीमेवर सध्या चीनसोबत तणाव सुरु आहे. यादरम्यानच भारताने आज मंगळवारी अंदमान आणि निकोबार द्वीप समूहाच्या भागात  ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाईलच्या एँटी-शिप व्हर्जनचे परिक्षण करण्यात आले आहे. हे परिक्षण भारतीय नौसेनेद्वारे केल्या जाणाऱ्या परिक्षणाचा एक भाग आहे. नौसेनेने याबाबत माहिती देताना सांगितलं की, ब्रह्मोस एँटी-शिप मिसाईलला आयएएस रणविजयद्वारे पिनपॉईंटवर अगदी अचूकतेने जास्तीतजास्त लांब बंगालच्या खाडीमध्ये लक्ष्यावर निशाणा साधून लाँच केलं. ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाईलची निर्मिती डीआरडीओकडून करण्यात आली आहे. 

भारताने 24 नोव्हेंबर रोजी अंदमान आणि निकोबार द्वीप समूहावरुन ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाईलच्या लँड अटॅक व्हर्जनचे परिक्षण केले आहे. ब्रह्मोस मिसाईलने तिथल्याच इतर एका द्वीपवर निशाणा साधला होता. 

ब्रह्मोस मिसाईलची भारत करणार निर्यात
एका कराराअंतर्गत भारताकडून फिलीपाईन्स  ब्रह्मोस हे मिसाईल खरेदी करणार आहे. ब्रह्मोस हे भारतीय बनावटीचे स्वदेशी मिसाईल आहे. या मिसाईलची निर्मिती भारत आणि रशिया या दोन्ही देशांनी मिळून केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारत आणि रशियाची संयुक्त अशी टीम जी या मिसाईलची निर्मिती करते ती लवकरत फिलीपाईन्सच्या सेनेला ब्रह्मोस मिसाईल देण्याचा करार करेल. डिसेंबर महिन्यात मनीला दौऱ्यात हा करार करण्यात येणार आहे. मनीला दौऱ्यात ही टीम या कराराबाबतच्या बाबी ठरवेल. भारत आणि फिलीपाईन्सच्या दरम्यान इतर अनेक मुद्यांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT