BrahMos Missile 
देश

BrahMos Missile: ब्रह्मोस क्षेपणास्त्र पडलं महागात; सरकारला 24 कोटीचा दणका

ब्राह्मोस क्षेपणास्त्र पाकिस्तानमध्ये चुकून डागल्याने भारताच्या तिजोरीला पडला खड्डा

धनश्री ओतारी

भारतीय हद्दीतून डागलं गेलेलं एक क्षेपणास्त्र थेट पाकिस्तानच्या हद्दीत घुसल्याची घटना गेल्या वर्षी घडली होती. या घटनेमुळं देशाला मोठा अर्थिक फटका बसला आहे. सरकारी तिजोरीचे २४ कोटी रुपयांचे नुकसान झाले, असे केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे.(BrahMos missile misfiring into Pakistan cost India 24 crore Centre tells Delhi HC)

तसेच, या निष्काळजीपणासाठी भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडरसह तीन अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे समर्थन केले. विंग कमांडर अभिनव शर्मा यांनी भारतीय हवाई दलाच्या सेवेतून काढून टाकण्याच्या विरोधात याचिका केली आहे. (Latest Marathi News)

या याचिकेला विरोध करताना केंद्राने प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात त्यांनी ‘रेकॉर्डवरील पुराव्याचे संवेदनशील स्वरूप तसेच, आंतरराष्ट्रीय समुदायाला क्षेपणास्त्राच्या गोळीबाराशी संबंधित महत्त्वाचे व्यावहारिक तपशील जाणून घेण्यात असणारा रस या पार्श्वभूमीवर कोर्ट मार्शलद्वारे तीन अधिकार्‍यांचा खटला चालवणे ‘अयोग्य’ आहे,’ असे नमूद केले आहे. (Marathi Tajya Batmya)

‘राज्याच्या सुरक्षेसाठी व्यापक परिणाम असलेल्या विषयाचे संवेदनशील स्वरूप लक्षात घेऊन, याचिकाकर्त्याची सेवा समाप्त करण्याचा निर्णय जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक निर्णय घेण्यात आला. भारतीय हवाई दलात २३ वर्षांनंतर असा निर्णय घेण्यात आला. कारण या प्रकरणातील तथ्ये आणि परिस्थितीनुसार अशी कारवाई करणे आवश्यक आहे,’ असे केंद्र सरकारने म्हटले आहे.(Marathi Tajya Batmya)

नेमकं काय घडलं?

9 मार्च रोजी चुकून एक क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या भूमीवर पडले होते.पाकिस्तानने हे प्रकरण उपस्थित केल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 15 मार्च रोजी संसदेत सविस्तर उत्तर दिले.ते म्हणाले होते की, पाकिस्तानमध्ये क्षेपणास्त्राचा अपघाती प्रक्षेपण झाल्याच्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत."दुर्दैवाने 9 मार्च रोजी एक क्षेपणास्त्र चुकून डागण्यात आले. ही घटना नियमित तपासणीदरम्यान घडली. आम्हाला नंतर कळले की ते पाकिस्तानात उतरले होते," असे त्यांनी राज्यसभेत सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ३३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार अतिवृष्टी, महापुराची नुकसान भरपाई; सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल सादर

Prashant Kishor on Bihar Election: अखेर प्रशांत किशोर यांनी निवडणूक न लढवण्यामागचं नेमकं कारण सांगितलं, म्हणाले..

पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय! सोलापूर शहरात रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत नाकाबंदी; प्रत्येक पोलिस ठाण्याअंतर्गत एक विशेष पथक

Baidpura Violence : गोमांस विक्रीच्या संशयावरून दोन गट आमनेसामने; दोन्ही गटाकडून तक्रारी, अदखलप्राप्त गुन्हे दाखल

Pune Traffic : पुणे-सातारा बाह्यवळण मार्गावर दिवाळीच्या गर्दीत वाहतूक कोंडीचा कहर

SCROLL FOR NEXT