देश

लहानशा खाणीत सापडला हिरा; वीटभट्टीवाला रातोरात कोटीचा मालक

सकाळ डिजिटल टीम

मध्य प्रदेशात एक अशी घटना घडलीये जी ऐकून तुम्ही हैराण व्हाल. एका लहानशा वीटभट्टीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीला एका उथळ खाणीमध्ये चक्क 26.11 कॅरेटचा हिरा सापडला आहे. मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यामध्ये हा प्रकार घडला असून त्यानंतर या घटनेची बरीच चर्चा सुरु झाली आहे. हा हिरा क्षुल्लक नसून लिलावामध्ये या हिऱ्याची किंमत तब्बल 1.20 कोटी लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती या त्या ठिकाणचे अधिकारी रवी पटेल यांनी दिली आहे. (diamond in a shallow mine)

पन्ना शहरातील किशोरगंज येथील रहिवासी असणाऱ्या सुशील शुक्ला आणि त्यांच्या साथीदारांना सोमवारी हा हिरा सापडला आहे. कृष्णा कल्याणपूर परिसरात असलेल्या खाणीत हा हिरा सापडला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. येत्या दोन दिवसांत हा हिरा लिलावासाठी ठेवण्यात येणार असून सरकारी रॉयल्टी आणि कर कपात केल्यानंतर मिळणारी रक्कम खाण कामगाराला दिली जाईल, असंही ते म्हणाले आहेत.

विशेष म्हणजे भाड्याने घेतलेल्या जमिनीवर हा लहान प्रमाणातील वीटभट्टीचा व्यवसाय शुक्ला करतात. त्यांनी पत्रकारांना सांगितलं की, ते आणि त्यांचे कुटुंबही गेल्या 20 वर्षांपासून हिऱ्यांच्या खाणीच्या कामात गुंतलेले आहेत. मात्र, त्यांना एवढ्या मोठ्या हिऱ्याच्या शोध लागण्याची ही घटना पहिलीच असल्याची त्यांनी नमूद केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parsi Dairy License Suspended : तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! मुंबईतील शंभर वर्षांहून जुन्या पारसी डेअरीचा परवाना निलंबीत; कोट्यावधींचे साहित्य जप्त

Hingoli: कळमनुरीमध्ये गोळीबारात तरुणाचा मृत्यू, चार गंभीर; दोन गटांत वाद, नगरसेवकासह १६ जणांवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : पुणे- दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार

Ratnagiri Green Steel Project investment : रत्नागिरीत 7 हजार 500 कोटींचे पाच नवे प्रकल्प; उद्योगमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा, 450 एकर जागेत काय-काय होणार?

Jayant Patil Jitendra Awhad Eknath Shinde : जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड रात्रीतून एकनाथ शिंदेंच्या भेटीला, बंद दाराआड ४५ मिनीटांच्या भेटीत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT