bride cancels wedding in between rituals after spotting ex boyfriend at venue in telangana 
देश

नवरदेव मंगळसूत्र घालणार तेवढ्यात नवरी म्हणाली थांब...

वृत्तसंस्था

हैदराबाद: विवाह सोहळ्यादरम्यान नवरदेवाने मंगळसूत्र हातात घेऊन नवरीच्या गळ्यात घालण्यासाठी हात वर केला. तेवढ्यात नवरीची नजर दुसरीकडे गेली आणि नवरी म्हणाली थांबा. नवरीने विवाह न करण्याचा निर्णय घेतल्याने परिसरात चर्चा रंगली आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, वानापार्टे जिल्ह्यातील चार्लापाले गावामध्ये ही घटना घडली आहे. गावामध्ये विवाह समारंभ मोठ्या उत्साहात सुरू होता. दोन्ही कुटुंबातील नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विवाह सोहळ्यादरम्यान वधू आणि वर त्यांच्या जवळच्या नातेवाईकांसह धार्मिक विधी पूर्ण करत होते. विधी पूर्ण झाल्यानंतर वराने वधूच्या गळ्यात मंगळसूत्र बांधण्यासाठी मंगळसूत्र हातात घेतले. नवरा मुलगा नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार तेवढ्यात तिने मला लग्न करायचे नाही म्हणून सांगितले. कारण समोर तिला तिचा बॉयफ्रेण्ड दिसला. तिच्या निर्णय ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. अनेकांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, ती कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. काही वेळातच तिने घटनास्थळावरून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

मुलीच्या नातेवाईकाने सांगितले की, 'विवाह सोहळा सुरळीतपणे सुरू होता. पण, तिचा बॉयफ्रेण्ड विवाहस्थळी आला. नवरीने त्याच्याकडे पाहिल्यानंतर काही क्षणातच तिने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो पळून गेला.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Parishad Election : महायुतीचा जागावाटापाच तिढा सुटला, १७ जागांसाठीचा अंतिम फॉर्म्युला निश्चित, कुणाच्या वाट्याला किती जागा?

IPL 2026, RCB vs GT Final: टॉस हरूनही शुभमन गिल म्हणतोय, मनासारखंच झालं! फायनलसाठी कशी आहे Playing XI

Eknath Shinde: बीएमसीपासून विधान परिषदपर्यंत भाजपकडून धक्के... एकनाथ शिंदेंनी सुरू केली मोठी तयारी; महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चुरस

IPL 2026 Final, RCB vs GT live: चार आयपीएल फायनल खेळणाऱ्या बंगळुरूचा इतिहास नाही खास, गुजरात म्हणूनच आनंदी

Mumbai Water Metro: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! पहिली वॉटर मेट्रो दाखल, प्रवासी सेवेत कधी उतरणार?

SCROLL FOR NEXT