The bride was enjoying the dance Suddenly the fastest car crashed the people
The bride was enjoying the dance Suddenly the fastest car crashed the people 
देश

Video: नवरी एन्जॉय करत होती डान्स अन् अचानक वऱ्हाडींमध्ये घुसली भरधाव कार

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये लग्नाच्या वरातीचा एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हायवेवरुन जाणाऱ्या या वरातीत अचानक एक भरधाव कार घुसली आणि तीनं अनेक वऱ्हाडींना चिरडलं. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत.

विशेष नवरी आपल्या कारच्या सनरुफ बाहेर येऊन डान्स करत होती. याचवेळी तिच्या बाजूला हा थरार घडला सुदैवानं ती यातून थोडक्यात बचावली. ज्यावेळी नवरी डान्स करत होती तेव्हा लोक तिच्या कारजवळ उभे होते. यावेळी हायवेवरुन एकामागून एक वाहनं भरधाव वेगाने पुढे गेली त्यानंतर आलेल्या एका भरधाव कारनं रस्त्याच्या कडेला असलेल्या वरातीतील लोकांना उडवलं. ही कार इतक्या वेगातं होती की, ज्या लोकांना या कारनं उडवलं. ते लोक हवेत उंच उडाले, तिथे सुरु असलेल्या कॅमेरॅत ही संपूर्ण घटना कैद झाली. या घटना व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला.

या घटनेनंतर भरधाव कार चालवणारा आरोपी चालक आपल्या कारमधून बाहेर पडत पळून गेला. या घटनेची खबर कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT