marriage  esakal
देश

Marriage News: भर मंडपातून पळून गेला नवरदेव! नवरीनं पाठलाग करुन पकडलं अन्...; वाचा अजब लग्नाची गजब गोष्ट

लग्नाला सप्तपदी सुरु होण्याच्यावेळेसच नवरदेवाचं डोकं फिरलं आणि त्यानं धूम ठोकली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

बरेली : भर लग्नातून पलायन केलेल्या नवरदेवाला नवरी मुलीनं तब्बल 20 किमी पाठलाग करुन पकडलं. विशेष म्हणजे या दोघांचा प्रेमविवाह होत होता. पण अचानक नवऱ्या मुलानं टोकाचं पाऊल उचलल्यानं सर्वजण आवाक् झाले होते. (bridegroom ran away from mandap wife chased and caught him)

उत्तर प्रदेशातील बरेली इथं हा प्रकार घडला असून यामध्ये नवरा आणि नवरी हे दोघे एकमेकांना पूर्वीपासून ओळखत होते. त्यांच्यामध्ये गेल्या अडीच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांचे प्रेमसंबंध घरी माहिती झाल्यानं त्यांच्या कुटुंबियांनी दोघांचं लग्न लावून देण्याची तयारी दर्शवली. Latest Marathi News

त्यामुळं ठरल्यानुसार, रविवारी बरेलीतील एका मंदिरात तरुणीच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत दोघांच्या लग्नाची तयारी करण्यात आली होती. यासाठी तरुणी नटून-थटून आली होती. जेव्हा सप्तपदी घेण्याची वेळ आली तेव्हा ती मंडपात दाखल झाली पण यावेळी अचानक नवऱ्या मुलाचं डोकं फिरलं आणि मुलीनं साज-श्रृंगार केल्यानं भडकला तसेच आपल्या आईला घेऊन येतो असं सांगून तो मंडपातून पळून गेला.

पण बराच काळ नवरा मुलगा परत न आल्यानं नवरीमुलीनं फोनवरुन त्याच्याशी संपर्क साधला. फोनवर त्यानं सांगितलं की आपल्या आईला सांगण्यासाठी तो गावाकडं चालला आहे. त्यानंतर नवरी मुलीनं २० किमी पर्यंत पाठलाग करत नवऱ्या मुलाला एका बसमध्ये बसलेला असताना पकडलं. यावेळी मुलीला नवरीच्या वेशात पाहून लोकही आश्चर्यचकित झाले.

यावेळी नेमकं काय घडलंय हे कोणालाच कळत नव्हतं? नंतर कळलं की नवरा मुलगा लग्नाच्या मंडपातून पळून आला आहे. पण नवरीनं त्याला बसमधून खाली उतरवलं. त्यानंतर भर रस्त्यात मुलगा आईला घेऊन येतो असं सांगत राहिला तर नवरीनं आधी लग्न कर असं सांगत राहिली. यावरुन दोघांमध्ये बराच काळ वाद झाला. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली.

नंतर नवरा मुलगा लग्नासाठी तयार झाला आणि नवरीसोबत लग्नस्थळी मंदिरात दाखल झाला. त्यानंतर त्यानं भमोरा इथल्या शिवमंदिरात लग्न करत नवरी बनलेल्या प्रेमिकेच्या गळ्यात मंगळसुत्र बांधलं. यानंतर नवरीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं त्यानंतर ती आपल्या पतीसह कुटुंबियांसह घरी परतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT