Broadband Sakal
देश

साडेतीन लाख गावांपर्यंत ब्रॉडबँड; पॅकेजरूपी घोषणांवर शिक्कामोर्तब

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या पॅकेजरूपी घोषणांवर केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शिक्कामोर्तब केले.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या पॅकेजरूपी घोषणांवर केंद्रीय मंत्रिमंडळाने (Central Cabinet) आज शिक्कामोर्तब केले. यामध्ये १६ राज्यांमधील भारतनेटसाठी १९०४१ कोटीच्या व्हायेबिलिटी गॅप फंडीगला मंजुरी, ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा यासारख्या अन्य निर्णयांचा समावेश आहे. (Broadband Service in Village Central Cabinet Announcing)

संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी, कोरोनाची येऊ घातलेली तिसरी लाट, लसीकरण यासारख्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्व केंद्रीय मंत्र्यांसोबतच स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री आणि उर्वरित राज्यमंत्र्यांनाही बोलावण्यात आले होते. या बैठकीनंतर माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद तसेच ऊर्जा राज्यमंत्री आर. के. सिंह यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली. अर्थमंत्र्यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या घोषणांना तातडीने मंजुरी देण्याचा मोदी सरकारचा धडाडीचा निर्णय असल्याचा दावा मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला.

ब्रॉडबॅंड सेवा १६ राज्यांमधील गावांपर्यंत पोहोचविण्यासाठी पीपीपी मॉडेल अंतर्गत भारतनेटच्या अंमलबजावणीला केंद्रीय मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखविल्याचे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. माहितीचा महामार्ग गावापर्यंत पोहोचवण्याचा ऐतिहासिक निर्णय असल्याचा दावाही त्यांनी केला. १६ राज्यांमधील ३.६० लाख गावांपर्यंत ब्रॉडबॅंड पोहोचविण्यासाठी २९४३२ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली असून यात व्हायेबिलिटी गॅप फंड १९०४१ कोटी रुपयांचा असेल. ब्रॉडबॅंड सेवेच्या या विस्तार मोहिमेत खासगी क्षेत्रालाही जोडले जाणार आहे. तर वीज क्षेत्रातील सुधारणांचा आग्रह धरणारी पाचवर्षीय पुनर्रचित वितरण क्षेत्र योजनेलाही मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेचे सूतोवाच केले होते. त्यानंतर या पॅकेजमध्येही या योजनेची दुसऱ्यांदा घोषणा झाली होती. पायाभूत व्यवस्था बळकट करण्यासाठी आर्थिक साहाय्य करून सर्व वीजवितरण विभागांच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी ही योजना असल्याचे राज्यमंत्री आर. के. सिंह म्हणाले.

आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचा विस्तार

३.०३ लाख कोटी रुपयांच्या या योजनेवर मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीने शिक्कामोर्तब केले. यासोबतच कोरोना संकटाची झळ बसलेल्या क्षेत्रांसाठी १.१ लाख कोटी रुपयांची कर्ज योजना, आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचा विस्तार, आपत्कालीन पतहमी योजनेमध्ये १.५ लाख कोटी रुपये वाढीव कर्ज देणे या योजनांनाही मंजुरी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT