BRS Nagpur Office  
देश

BRS Nagpur Office : "विचारधारा बदलत नाही तोपर्यंत..." KCR यांनी कार्यकर्त्यांना दिला विजयाचा मंत्र!

Sandip Kapde

BRS Nagpur Office : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) यांनी आज (गुरुवार) नागपुरात त्यांच्या पक्षाच्या पहिल्या कार्यालयाचे उद्घाटन केले. केसीआरची भारत राष्ट्र समिती (BRS) तेलंगणा व्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये आपला पाया वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. नागपूर कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी केसीआरच्या उपस्थितीसह विदर्भातील बीआरएस सदस्यांनी इतर अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

केसीआर म्हणाले, देशात दलितांची काय स्थिती आहे? जोपर्यंत दलितांची गरिबी आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार दूर होत नाहीत, तोपर्यंत आमच्या चेहऱ्यावरील डाग हटणार नाही. अमेरिकेत गोर्‍यांनी स्थानिकांवर अत्याचार केले. एका कार्यक्रमात मी म्हटले होते की, बराक ओबामा यांना राष्ट्राध्यक्ष करून अमेरिकेने आपली पापे धुवून काढले.

जोपर्यंत दलितांवर अत्याचार होत राहतील, तोपर्यंत आपल्याला शांतता मिळणार नाही… आदिवासी किती दिवस त्यांच्या हक्कांसाठी लढणार?. जोपर्यंत देश आणि त्याची विचारधारा बदलत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. फक्त निवडणुका येतील आणि जातील आणि नाटक चालत राहतील.

केसीआर त्यांच्या पक्षाला राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ते पक्षाचा मोठ्या प्रमाणात विस्तार करत आहेत. बीआरएस महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका लढवण्याची शक्यता आहे. बीआरएस 'अबकी बार किसान सरकार'चा नारा देत निवडणूक लढवणार आहे. हा नारा देत बीआरएसने शेतकऱ्यांना आपल्या बाजूने उभे करण्याची योजना आखली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: कामासाठी इमारतीमध्ये गेले; पण कुत्रा मागे लागला अन्...; सारंच संपलं! पुण्यात 'त्या' इलेक्ट्रिशियनसोबत काय घडलं?

Ahilyanagar : एबी फॉर्म मिळवून अर्ज भरला, पक्षानं काढून टाकलं, चोरीचा ठपका ठेवत शिस्तभंगाची कारवाई

Stock Market Today : आज भारतीय शेअर बाजार विक्रमी पातळीच्या जवळ बंद; सेन्सेक्स तब्बल 446 अंकांनी वाढला; हे शेअर्स फायद्यात!

Latest Marathi News Update LIVE : अनिल देशमुखांच्या मुलाचा शरद पवार गटाला रामराम

Pune Municipal Election : पुण्यात ३५ लाख ५१ हजार मतदार! १० प्रभागातील मतदार संख्या लाखाच्या पुढे, प्रचारात उमेदवारांची होणार दमछाक

SCROLL FOR NEXT