yediyurappa 
देश

Yediyurappa यांचे निवृत्तीचे संकेत; 8 वेळा अजिंक्य ठेवलेला मतदार संघ देणार मुलाला

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भाजपचे दिग्गज नेते आणि कर्नाटकचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले बीएस येडियुरप्पा यांनी आज घोषणा राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले. आपला दुसरा मुलगा बीवाय विजयेंद्र शिमोगा जिल्ह्यातील शिकारीपुरा मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली. शिकारीपुरा मतदार संघ येडीयुरप्पा कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. (BS Yediyurappa news in marathi)

यावेळी येडियुरप्पा यांनी आपल्या मुलासाठी जनतेकडे पाठबळ देण्याची विनंती केली. तसेच आपण निवडणूक लढवणार नसल्याचं म्हटलं. येडियुरप्पा यांनी 1983 पासून आठ वेळा या मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही ज्या प्रकारे मला पाठिंबा दिला आहे, त्याचप्रमाणे विजयेंद्र यांनाही पाठिंबा द्यावा. त्यांना एक लाखाहून अधिक मते मिळतील याची आम्हाला खात्री आहे," असही येडियुरप्पा यांनी मतदारसंघातील जनतेला उद्देशून म्हटलं. येडियुरप्पा यांचा मुलगा बी.वाय. राघवेंद्र लोकसभा सदस्य असून आता दुसऱ्या मुलाकडे त्यांनी आपला मतदारसंघ सुपूर्द केला आहे.

काँग्रेसवर टीका करताना येडियुरप्पा म्हणाले की, पक्षातील दोन लोक मुख्यमंत्रिपदासाठी लढत असून, पुढील निवडणुकीत भाजप प्रचंड बहुमताने सत्तेत येईल.

79 वर्षीय बीएस येडियुरप्पा हे देशातील दिग्गज लिंगायत नेते आहेत. ते 2014 मध्ये शिमोगामधून लोकसभेचे सदस्यही होते. त्यांचा मुलगा बीवाय राघवेंद्र यांनी 2014 मध्ये राघवेंद्र शिकारीपुरा येथून विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकिटावर विजयी झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT