Firing At Pakistani Drone Esakal
देश

Pakistani Drone: भारत-पाक सीमेवर थरार, सुमारे 25 राउंड फायरिंगनंतर पळाले पाकिस्तानी ड्रोन

India-Pakistan Border: बीएसएफच्या जवानांनी पाक रेंजर्सचे हे नापाक कृत्य हाणून पाडले होते आणि पाकिस्तानी ड्रोनला मागे पळण्यास भाग पाडले होते.

आशुतोष मसगौंडे

जम्मू आणि काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय समेजवळ बीएसएफच्या जवानांनी एका पाकिस्तानी ड्रोनवर गोळीबार करून त्याला पाडायचा प्रयत्न केला. दरम्यान, जवळपास 25 राउंड फायर करुनही हे ड्रोन पाकिस्तानी सीमेत जाण्यात यशस्वी ठरले.

अधिका-यांनी शनिवारी सांगितले की, सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी रात्री उशिरा पाकिस्तानी बाजूने ड्रोनची हालचाल शोधून काढली आणि सुमारे 25 गोळ्या झाडल्या.

गोळीबारानंतर ड्रोन पाकिस्तानी सीमेकडे परत गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर, ड्रोनद्वारे शस्त्रे किंवा अंमली पदार्थांची तस्करी होणार नाही याची खात्री करण्यासाठी रामगढ सेक्टरमधील नारायणपूर येथील बोर्डेट चौकीच्या परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली.

बीएसएफच्या 148 वाहनातील जवानांचा एक ड्रोन पाकिस्तानच्या अश्रफ अली पोस्टवरून भारताच्या नारायण पोस्टमध्ये घुसण्याचा प्रयत्न करताना दिसले. यानंतर बीएसएफच्या जवानांनी सुमारे दोन डझन राऊंड गोळीबार केला, त्यानंतर ड्रोन पाकिस्तानकडे परत गेला.

याआधीही बीएसएफच्या जवानांनी पाक रेंजर्सचे हे नापाक कृत्य हाणून पाडले होते आणि पाकिस्तानी ड्रोनला मागे पळण्यास भाग पाडले होते. पण नापाक पाकिस्तान वारंवार अपमान होऊनही आपल्या कारवाया सोडत नाही.

दरम्यान काही दिवसांपूर्वी अमृतसर सेक्टर टीमने दोन पाकिस्तानी ड्रोन जप्त केले आहेत. भारत-पाकिस्तान सीमेवर ड्रोन आणि हेरॉइन शोधण्याची प्रक्रिया सतत सुरूच असते. मिळालेल्या माहितीनुसार, सीमावर्ती गावात हरदो रतनमध्ये एक मोठा ड्रोन जप्त करण्यात आला असून दुसऱ्या सीमावर्ती गावात नेशतामध्ये एक छोटा ड्रोन जप्त करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT