Mayawati esakal
देश

BSP Chief : मायावतींची मोठी घोषणा, निवडणुकीत NDAचे उमेदवार जगदीप धनखर यांना बसपाचा पाठिंबा

मायावतींच्या बसपाने एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनाही पाठिंबा दिला होता.

सकाळ डिजिटल टीम

मायावतींच्या बसपाने एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनाही पाठिंबा दिला होता.

महाराष्ट्रातील सत्तानाट्यानंतर आता यूपीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी बसपने पत्ते उघडण्यास सुरुवात केली आहे. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजप एनडीएचे उमेदवार जगदीप धनखर यांना पाठिंबा देणार असल्याची घोषणा केली आहे. मायावतींनी स्वत: ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. दरम्यान, मायावतींच्या बसपाने एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनाही पाठिंबा दिला होता.

मायावती यांनी ट्विट करून म्हटलंय की, देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सत्ता आणि विरोधी पक्षांमध्ये एकमत न झाल्यामुळे पुन्हा निवडणूक घेण्यात आली आहे. आता हीच परिस्थिती असल्याने उपाध्यक्षपदाची निवडणूकही 6 ऑगस्टला पार पडत आहे. अशा परिस्थितीत व्यापक जनहित आणि उपाध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीत आपली वाटचाल लक्षात घेऊन जगदीप धनखड यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीदरम्यान बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी पत्रकार परिषद घेऊन एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला होता. एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले होते. आम्ही हा निर्णय भाजप किंवा एनडीएच्या समर्थनार्थ किंवा विरोधकांच्या विरोधात नसून आमचा पक्ष आणि आंदोलन डोळ्यासमोर ठेवून घेतला आहे. बसपा दुर्बल, गरीब आणि उपेक्षित लोकांसाठी निर्णय घेत आहे, असंही त्या म्हणाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वंदे मातरम्’ला योग्य सन्मानाचं स्थान पुन्हा मिळवून दिलं : अमित शहा

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

Ganesh Chaturthi 2026 : काशीत पेशव्यांनी सुरू केली २२० वर्षांची गणेशपूजा ; काय आहे देशातील दुसऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास ?

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

SCROLL FOR NEXT