Uniform Civil Code Sakal
देश

Uniform Civil Code: मायावतींचे समान नागरी संहितेवर वक्तव्य; आम्ही विरोध करत नाही, पण...

BSP supports UCC: समान नागरी संहितेवर मायावतींचे मोठे विधान

सकाळ डिजिटल टीम

Mayavati supports UCC: समान नागरी संहितेवर अनेक पक्षांच्या भूमिका समोर येत आहेत. अशातच बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्या म्हणाल्या की त्यांचा पक्ष समान नागरी संहितेला विरोध करत नाही.

आम आदमी पक्ष आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टीनंतर बहुजन समाज पार्टीने देखील आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी एक विधान केले ज्यात त्या म्हणाल्या की, त्यांचा पक्ष समान नागरी संहितेच्या विरोधात नाही. मात्र, भारतीय संविधान समान नागरी संहिता नागरिकांवर थोपण्याचे समर्थन करत नाही.

त्यानंतर मायावती म्हणाल्या की, समान नागरी संहितेशी निगडीत सर्व बाबींवर विचार केला पाहिजे. आमचा पक्ष समान नागरी संहितेच्या विरोधात नाही, पण यूसीसी लागू करण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या पद्धतीशी आम्ही असहमत आहोत. भारतीय जनता पक्ष समान नागरी संहितेच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे, असेही त्या म्हणाल्या. (Letest Marathi News)

बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा म्हणाल्या की, भारतासारख्या मोठी लोकसंख्या असणाऱ्या देशात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध आणि पारशी यांसारख्या वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात. त्यांची राहण्याची, खाण्या-पिण्याच्या पद्धतीमध्ये देखील विविधता बघायला मिळते. त्यांच्या परंपरांमध्ये देखील भिन्नता बघायला मिळते. या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही.

देश मजबूत होईल

मायावती म्हणाल्या की, जर समान नागरी संहिता लागू झाली तर प्रत्येक धर्म मानणाऱ्या व्यक्तीला एकच कायदा लागू होईल, ज्यामुळे देश मजबूत होईल. ही गोष्ट अंशत: बरोबर आहे.

'आप'ने सर्वात आधी दिले होते समर्थन

समान नागरी संहितेला सर्वात आधी आम आदमी पक्षाने समर्थन दर्शवले होते. आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संदिप पाठक एका माध्यम संस्थेशी बोलताना म्हणाले होते की, त्यांचा पक्ष यूसीसीचा सैद्धांतिक स्वरुपात समर्थन करतो. ते म्हणाले होते की, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ४४ मध्ये देखील सांगण्यात आलंय की देशात समान नागरी संहिता असली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT