अमृतसर : पंजाबमधील अमृतसर येथील बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या (BSF) मेसवर गोळीबार झाल्याचं वृत्त असून या हल्ल्यामध्ये सहा जवान गंभीर जखमी झाले होते. यांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला तर एकाची स्थिती अद्याप चिंताजनक आहे. मेसमध्ये जेवणासाठी एकत्र जमलेल्या जवानांना एकाच वेळी टार्गेट करण्यात आलं. (Bullets fired at Amritsar BSF mess 10 jawans injured one dead)
रविवारी अमृतसरमधील खासा गावातील बीएसएफच्या मेसमध्ये रविवारी ६ मार्च रोजी सकाळी हा प्रकार घडला. हा दहशतवादी हल्ला नसून एका बीएसएफ कॉन्स्टेबलनंच हा अंधाधुंद गोळीबार केला. दरम्यान, या हल्ल्यात हल्लेखोर कॉन्स्टेबलसह चार जवान ठार झाले आहेत. मृत्यू पावलेल्या या जवानांचे पार्थीवं रुग्णालयात आणण्यात आली आहेत. या हल्ल्यात इतर सहा जवानही जखमी झाले असून यांपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.
या हल्ल्यातील सर्व जखमी जवानांना गुरु नानक देव रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. ज्या बीएसएफ कॉन्स्टेबलनं हा गोळीबार केला त्याचं नाव सट्टेप्पा एस. के. असं आहे, तो देखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता, त्याचाही मृत्यू झाला आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश बीएसएफकडून देण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.