Rescue teams at the accident site in Almora district, Uttarakhand, after a passenger bus plunged into a deep gorge causing multiple casualties.
esakal
Uttarakhand Bus Accident : उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. या ठिकाणी एक प्रवासी बस दरीत कोसळली असून, सात जणांचा मृत्यू झाला आहे. दोन महिलांसह १२ प्रवासी जखमी झाले आहेत. पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्मोडा येथील भिकियासैन परिसरातील शिलापाणीजवळ हा भीषण अपघात झाला. तर अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस, अग्निशामक दल दाखल झाले आणि बचाव कार्य सुरू झाले. जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, बसमध्ये एकूण १९ प्रवासी होते. अपघाताचे कारण तपासले जात आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याचा संशय आहे. तर मृतांमध्ये पाच पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. जखमींना त्वरित आणि योग्य वैद्यकीय सेवा देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत. शिवाय, त्यांनी सांगितले की ते या प्रकरणावर वैयक्तिकरित्या लक्ष ठेवून आहेत आणि अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.