Indore-Amalner bus fell into Narmada river 13 passengers killed in ST accident jalgaon
Indore-Amalner bus fell into Narmada river 13 passengers killed in ST accident jalgaon  sakal
देश

नदीत कोसळल्यानंतर बस चेपली; आत १० मृतदेह अन्...; प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरार

सकाळ डिजिटल टीम

धार : महाराष्ट्राची एसटी बस मध्य प्रदेशातील धार इथं नर्मदा नदीत कोसळून १३ प्रवाशांचा मृ्त्यू झाल्याची दुःखदायक घटना काल घडली होती. ही घटना स्वतः प्रत्यक्ष पाहणाऱ्या नदीतील नावाड्यानं हा थरारक अनुभव सांगितला आहे. माझ्या समोर ८० फूट उंचावरुन बस नदीत कोसळल्यानंतर बस टपापासून चाकापर्यंत अक्षरशः चेपली गेली होती. त्यानंतर बसमध्ये पाहिलं असता त्यात ८ ते १० प्रवाशांचे मृतदेह होते, अशी माहिती त्यानं दिली. दैनिक भास्करनं याबाबत वृत्त दिलं आहे. (bus overturned after plunging into the river Inside were 10 dead bodies Eyewitness told the thrill)

या घटनेचा साक्षीदारानं सांगितलं की, मी नर्मदा नदीत नाव वल्हवत होतो. माझ्या डोळ्यासमोर ८० फुटांवरील पूलावरुन एक बस नदी पात्रात कोसळली. त्यानंतर मी तात्काळ बसच्या दिशेनं नाव वळवली. सुमारे दहा मिनिटांनंतर मी घटनास्थळी पोहोचलो. यावेळी माझ्यासोबत माझा एक सहकारी देखील होता. बस उलटल्यानं पूर्णपणे पाण्यात बुडाली होती. केवळ तिचे काही चाकं वर दिसत होती. पाण्यातील दगडांवर कोसळल्यानं ती टपापासून चाकांपर्यंत चेपली गेली होती. बसचा काही भाग तुटून विखुरला होता. आम्ही बसमधील चादर हटवण्याचा प्रयत्न केला तर माझा हात कापला गेला. आम्ही मृतदेह कसेबसे बाहेर काढत होते. आतमध्ये डोकावून पाहिलं तर ८ ते १० मृतदेह पडलेले नजरेस पडले. एक महिला खिडकीच्या जाळीला अडकून पडली होती. तिला बाहेर काढण्यासाठी खिडकीतून हात आतमध्ये टाकत जाळी तोडावी लागली. मोठ्या प्रयत्नानंतरही त्या महिलेला बाहेर काढण्यात अयशस्वी ठरलो. त्यानंतर बचाव पथक दाखल झालं आणि बचाव मोहिम सुरु झाली. असा हा भयानक प्रसंग नाविक नरसिंग यांनी सांगितला.

नातेवाईकांनी सांगितलं कुटुंबाचं दुःख

या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांनी आपल्या आप्तजनांच्या जाण्यामुळं झालेलं दुःख आणि अपूर्ण राहिलेल्या इच्छा सांगितल्या. यामध्ये अमळनेरचे रहिवासी असलेल्या निंबाजी यांचा मुलगा ज्ञानेश्वर पवार यांनी सांगितलं की, वडील रविवारी अमळनेरच्या बसमधून आम्हाला इंदौरला भेटायला आले होते. आईच्या डोळ्याचं ऑपरेशन असल्यानं ते सोमवारी लगेचच घरी परतणार होते. त्यांना बसमध्ये बसवून देण्यासाठी मी स्वतः बस स्टँडला गेलो होतो. सकाळी ८.२० मिनिटांनी सकाळी ते बसनं निघाले त्यानंतर सकाळी ११ वाजता फोन आला की, वडिल या दुर्घटनेचे शिकार झाले.

या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या सौफुद्दीन यांचे मेव्हणे असगर यांनी सांगितलं की, पुलावरुन जाण्यापूर्वी बस खलघाट स्टॉपवर थांबली होती. मी मेव्हण्यांना भेटण्यासाठी स्टॉपवर गेलो होतो. बस निघाल्यानंतर मी त्यांना सलाम केला. त्यानंतर लगेचच पाचच मिनिटांत बस नदीत कोसळल्याचं वृत्त आलं. मी घटनास्थळी पोहोचलो तर तिथं कोणीतरी रडताना दिसेल असं मला वाटलं पण कोणीही वाचण्याची शाश्वती नव्हती. रक्तानं नदीचं पाणी लालभडक झालं होतं.

संदीप पाटील म्हणाले, माझ्या मावशीचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. ती बेटावदची रहिवाशी होती. ८ दिवसांपूर्वी ती मुलीकडे इंदौरला आली होती. त्यानंतर सकाळी ती बेटावदला जाण्यासाठी बसमधून निघाली. पण आम्हाला सकाळी फोन आला की बस नदीत कोसळली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

Vada Pav Girl: ना अटक झाली, ना केस.. मग वडापाव गर्लला का घेऊन गेले दिल्ली पोलीस? व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

Viral Video: शिक्षिकेला शाळेत उशिरा येणे पडलं महागात, मुख्याध्यापिकेने केली मारहाण, कपडेही फाडले

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT