anil ambani esakal
देश

अनिल अंबानींचा स्विस बँकेत काळा पैसा, कोट्यवधींचा कर बुडवला; 'इन्कम टॅक्स'ची नोटीस

कर कायदा 2015 च्या कलम 50 आणि 51 अंतर्गत खटला चालवला जाऊ शकतो

सकाळ डिजिटल टीम

स्विस बँकेतील 2 खात्यात काळा पैसा ठेवल्या प्रकरणी अनिल अंबानी यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. त्याच बरोबर आयकर विभागाने 2 स्विस बँकेतील खात्यात तब्बल 814 करोड पेक्ष्या जास्त काळा पैसा ठेवला आहे. आणि 420 करोड रुपयांचा टॅक्स बुडवल्याचा आरोप रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्या वर आहे, काळा पैसा कायद्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे.

विभागाने 63 वर्षीय अंबानी यांच्यावर कर बुडवल्याचा आरोप लावला आहे, असे म्हटले आहे की त्यांनी हेतुपूर्वक त्यांच्या परदेशी बँक खात्याचे तपशील आणि आर्थिक व्यवहार भारतीय कर अधिकाऱ्यांना सांगितले नाहीत. या प्रकरणी अंबानी यांना या महिन्यात कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. विभागाने म्हटले आहे की या प्रकरणात अनिल अंबानी यांच्यावर काळा पैसा,अघोषित परदेशी उत्पन्न आणि मालमत्ता, कर कायदा 2015 च्या कलम 50 आणि 51 अंतर्गत खटला चालवला जाऊ शकतो.

ज्यामध्ये दंडासह 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देखील होवु शकते. अनिल अंबानी यांना 31 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.

या संदर्भात अनिल अंबानी किंवा त्यांच्या कार्यालयाकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेल नाही. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, अनिल अंबानी यांच्यावर 2012-13 ते 2019-20 या दरम्यान विदेशी बँकांमध्ये अघोषित मालमत्ता ठेवून कर बुडवल्याचा आरोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lindsey Graham Death : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विश्वासू खासदाराचे निधन, भारताला दिली होती ५०० टक्के टॅरिफची धमकी

Sangli Weather Forecast Next 5 Days : कोयना, चांदोली धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती! 24 ते 25 जुलैनंतर मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता, पाहा हवामान अंदाज

Latest Marathi News Update : देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चेला उधाण, बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

Thane DCC Bank : ठाणे जिल्हा बँकेवर भाजप-शिवसेना महायुतीचा झेंडा! रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंच्या 'चाणक्यनीती'मुळे बविआचा गेम ओव्हर, नवे अध्यक्ष कोण?

Deccan Queen Heritage Coach : मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' नव्या हेरिटेज लूकमध्ये; चहा, नाष्टा, डायनिंग ट्रेनचा अनुभव खतरनाक

SCROLL FOR NEXT