Hyderabad Women kidnapping 
देश

Hyderabad Women: लग्नाला नकार दिला म्हणून तिने टीव्ही अँकरचे केले अपहरण; हैद्राबादमधील उद्योजिकेला अटक

businesswoman in Hyderabad kidnapping a television anchor: टेलिव्हिजन अँकर प्रणव सिस्टला याने महिलेला लग्नास नकार दिल्यानंतर त्याचे अपहरण करण्यात आले. मेट्रिमोनियल साईटवर प्रोफाईल पाहून त्रिशाने प्रणवशी संपर्क साधला होता.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- हैद्राबादमधील एका उद्योजीकेला टीव्ही अँकरचे अपहरण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका अनोळखी व्यक्तीने अँकर असल्याचं सांगून महिलेची फसवणूक केली होती. तिच्याकडून हजारो रुपये उकळले होते. यानंतर महिलेने अँकरचे अपहरण करण्याचा कट रचला. (businesswoman in Hyderabad was arrested for stalking and kidnapping a television anchor)

भोगीरेड्डी त्रिशा ही पाच स्टार्टअप कंपन्यांची व्यवस्थापकीय संचालिका आहे. टेलिव्हिजन अँकर प्रणव सिस्टला याने महिलेला लग्नास नकार दिल्यानंतर त्याचे अपहरण करण्यात आले. मेट्रिमोनियल साईटवर प्रोफाईल पाहून त्रिशाने प्रणवशी संपर्क साधला होता. तपासात असं आढळून आलंय की, प्रणवच्या नावाने एका अज्ञात व्यक्तीने मेट्रोमोनियल साईटवर प्रोफाईल तयार केले होते.

३१ वर्षीय त्रिशा डिजिटल मार्केटिंग कंपनी चालवते. या प्रकरणी त्रिशासह तिच्या पाच मित्राना तेलंगणा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला मैत्री करण्यासाठी पुरुषांचा शोध घ्यायची. त्रिशाने प्रणवच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी त्याच्या कारवर एअरटॅग देखील लावला होता.

त्रिशा ही माधापूरची रहिवाशी आहे. चैतन्या रेड्डी नावाचा व्यक्तीने प्रणवचा फोटो मेट्रोमोनियल साईटच्या प्रोफाईलवर ठेवून त्रिशाशी दोन वर्षांपूर्वी बोलणं सुरु केलं होतं. चैतन्याने आपल्याला फसवलं हे कळाल्यानंतर ती चिडली होती. प्रणवचा व्हॉट्सअप क्रमांक घेऊन तिने त्याच्याशी संपर्क साधला. प्रणवने तिला सगळी हकीकत सांगितली. तरी त्रिशाने त्याला मेसेज करणे सुरुच ठेवले.

प्रवणने त्रिशाला ब्लॉक केले. हेही तिला सहन झाले नाही. त्यानंतर तिने ५० हजार रुपये देऊन ऑफिसमधील एका मित्राला प्रणवचे अपहरण करण्याचा कट रचला. ११ फेब्रुवारीला प्रणवचे अपहरण करण्यात आले. त्याला त्रिशाच्या ऑफिसमध्ये ठेवण्यात आलं. त्याच्यावर याठिकाणी अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. त्रिशाची समजूत काढून प्रणव कसेतरी तेथून सुटला. त्यानंतर प्रणवने पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT