Tripura CM Manik Saha
Tripura CM Manik Saha esakal
देश

त्रिपुरात काँग्रेसला मोठा धक्का; मुख्यमंत्र्यांनी पोटनिवडणुकीत मारली बाजी

सकाळ डिजिटल टीम

सहा राज्यांतील लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या सात जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत.

नवी दिल्ली : देशामधील सहा राज्यांतील लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या सात जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झालीय. या जागांसाठी 23 जून रोजी मतदान झालं होतं. दरम्यान, या पोटनिवडणुकीत त्रिपुराचे (Tripura) मुख्यमंत्री माणिक साहा (Manik Saha) टाउन बारडोवली मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

निवडणूक आयोगाच्या (Election Commission) वेबसाइटनुसार, माणिक साहांनी काँग्रेसच्या आशिष कुमार साहा यांचा 6,104 मतांनी पराभव केलाय. माणिक साहा यांना मुख्यमंत्रिपदावर राहण्यासाठी पोटनिवडणूक जिंकणं आवश्यक होतं. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि सपाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांनी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर, खासदारपदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळं रिक्त झालेल्या आझमगड आणि रामपूर लोकसभा जागांवर पोटनिवडणूक झालीय. आझमगड आणि रामपूरमध्ये अनुक्रमे ४८.५८ टक्के आणि रामपूर ३९.०२ टक्के मतदान झालं, जे गेल्या निवडणुकीत मिळालेल्या मतांपेक्षा कमी आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवडीमुळं रिक्त झालेल्या संगरूर लोकसभा जागेच्या पोटनिवडणुकीत मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही आणि केवळ 36.40 टक्के मतदान झालं. दिल्लीच्या राजेंद्र नगर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत केवळ 43.75 टक्के मतदान झालंय. आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा राज्यसभेवर गेल्यानं रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक घ्यावी लागली. तर त्रिपुरामध्ये आगरतळा, टाउन बारडोवाली, सुरमा आणि जुबराजनगर या चार विधानसभा जागांसाठी तसेच झारखंडमधील मंदार आणि आंध्र प्रदेशातील आत्मकुरू विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक झालीय. या मतदारसंघांचे निकाल येणं बाकी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT