Snakes Farming  esakal
देश

Snakes Farming : सापांची शेती करून हा पठ्ठ्या कमावतो कोट्यवधी रुपये! जाणून घ्या कशी करतात सापांची शेती

जगात असा एक देश आहे जिथं लोकं सापाची शेती करतात.

सकाळ डिजिटल टीम

Snakes Farming : भारत कृषीप्रधान देश आहे. देशात अन्नधान्य, फळं आणि भाजीपाल्याची शेती केली जाते. मत्स्योत्पादन, कोंबडी पालन तसेच इतर काही व्यवसायही केले जातात. परंतु, तुम्हाला सापाची शेती करा म्हंटलं तर. आता तुम्हाला सापाची शेती आणि त्यातून केली जाणारी कमाई याची माहिती देतो.

साप पाहताच लोकं पळतात किंवा त्याला मारून टाकतात. पण, जगात असा एक देश आहे जिथं लोकं सापाची शेती करतात. त्यातून कोट्यवधी रुपये कमावतात. सापाची शेती करणाऱ्या देशाचे नाव तुमच्यासाठी काही नवीन नाही. तो देश म्हणजे चीन होय. चीनच्या जीसीकियाओ गावांमध्ये लोकं सापाची शेती करतात. त्यातून मोठ्या प्रमाणात कमाई करतात. या गावाचा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत साप आहे. यामुळे गावाला स्नेक व्हिलेज म्हणतात.

जगात सापांच्या शेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या या गावात घरोघरी सापाची शेती केली जाते. गावाची लोकसंख्या सुमारे एक हजार आहे. येथे राहणारे व्यक्ती सुमारे तीस हजार सापांचे पालन करतो. यावरून किती रुपयांची उलाढाल होत असेल याचा अंदाज येतो.

सापाच्या मांसापासून फायदा

जीसीकियाओ गावात विषारी सापही पाळले जातात. कोबरा सापाच्या विषामध्ये वीस लोकांना मारण्याची क्षमता असते. येथील मुलं खेळण्याऐवजी सापांशी खेळतात. सापांचे मांस तसेच विष विक्री करून लोकं करोडो रुपये कमावतात. सापाचे विष सोन्यापेक्षाही जास्त महाग आहे. सर्वात जास्त विषारी सापाचे एक लीटर विष हे तीन कोटी रुपयांचे होते.

चीनमध्ये सापाचे मासही खाल्ले जाते. यातून लोकं लाखो रुपये कमाई करतात. भारतात पनीर खातात, तसा चीनमध्ये साप खातात. सापांना लाकडाच्या किंवा काचेच्या बॉक्समध्ये पाळले जाते. सापाच्या चामड्यापासून बेल्ट तसेच इतर सामान बनवले जाते.

कशी आली कल्पना

येंग होंग चेंग नावाचा शेतकरी होता. तो आजारी पडला. गरिबीमुळे तो उपचारासाठी पैसे जमा करू शकला नाही. स्वतःच्या उपचारासाठी जंगली सापाला पकडून औषध तयार केली. स्वतःचे प्राण वाचवले. शिवाय दुसऱ्यांचेही प्राण वाचवले. तेव्हापासून गावात सापांची शेती सुरू झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात मोठी उलथापालथ! इतकी वर्ष संघासोबत असलेल्या भरवशाच्या खेळाडूने साथ सोडली, MS Dhoni...

Newly Married Woman : 2 दिवसांनी होतं मुलीचं बारसं, घरात चालू होती तयारी; पण त्याआधीच 23 वर्षांच्या 'या' उच्चशिक्षित माऊलीनं...

Latest Marathi News Live Update : जेजुरीत वारकऱ्यांच्या अपघातांची मालिका सुरूच; दुचाकीच्या धडकेत दिंडी प्रमुख गंभीर जखमी

Pune Airport: पुणे विमानतळाचे जुने टर्मिनल ‘बिकास’च्या प्रतीक्षेत; दीड वर्षापासून बंद, पुनर्विकासासाठी २४ कोटी रुपयांचा खर्च

Pune News: चिखली-कुदळवाडीनंतर मोईतही प्रशासनाचा बुलडोझर; अवैध भंगार व्यवसायावर कारवाई, खेड तालुक्यात प्रशासनाची मोठी कारवाई!

SCROLL FOR NEXT