modi parliament
modi parliament 
देश

4 कोटी SC विद्यार्थ्यांना मोदी सरकारचं गिफ्ट; 59 हजार कोटींच्या स्कॉलरशिपला मंजुरी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रीमंडळाने बुधवारी 59 हजार कोटी रुपयांच्या पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजनेला परवानगी दिली आहे. या योजनेंतर्गत पाच वर्षात चार कोटी एससी विद्यार्थी, विद्यार्थींनींना फायदा मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी याबाबत माहिती दिली. 

थावरचंद गेहलोत यांनी सांगितलं की, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी 59 हजार कोटी रुपयांची तरतूद असून यातील 35 हजार 534 कोटी रुपये केंद्र सरकार खर्च करेल तर इतर निधी राज्य सरकारकडे सोपवण्यात येणार आहे. या योजनेचा फायदा एससी प्रवर्गातील 4 कोटी विद्यार्थी-विद्यार्थीनींना होणार आहे. 

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही मंत्रिमंडळ बैठकीनंतर निर्णयांची माहिती दिली. यामध्ये देशात डीटीएच सेवा देण्यासाठी नियमांमध्ये संशोधनाला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. आता 20 वर्षांसाठी जारी करण्यात आलेल्या डीटीएस लायसनसाठीचं शुल्क हे तीन महिन्याला घेण्यात येईल.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT