1Supreme_Court_37.jpg 
देश

कुटुंब नियोजनाबाबत कोणावर सक्ती करु शकत नाही, केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात शपथपत्र

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली- देशात नागरिकांवर कुटुंब नियोजनासाठी सक्ती करणे किंवा मुलांना जन्म देण्याची संख्या निश्चित करण्यास सरकारचा विरोध आहे, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवरील सुनावणी दरम्यान सांगितले. सर्वोच्च न्यायालयात दाखल शपथपत्रात आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, देशात कुटुंब कल्याण कार्यक्रम ऐच्छिक आहे. लोकांना त्यांचा परिवार किती मोठा असावा हे निश्चित करणे आणि कोणत्याही सक्तीशिवाय कुटुंब नियोजनाच्या पद्धती अवलंबण्यास सक्षम बनवतो. आरोग्य मंत्रालयाकडून हे उत्तर भाजप नेता आणि वकील अश्विनी कुमार उपाध्याय यांच्याकडून दाखल एका जनहित याचिकेच्या उत्तरादाखल देण्यात आले आहे. 

अश्विनी कुमार उपाध्याय यांच्या या याचिकेत दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका आदेशला आव्हान देण्यात आले होते. यामध्ये देशातील वाढती लोकसंख्या नियंत्रित करणे आणि दोन मुलांच्या नीतीबरोबर काही मागण्या फेटाळल्या होत्या. आपल्या उत्तरादाखल आरोग्य मंत्रालयाने सार्वजनिक आरोग्य राज्याचा विषय असल्याचे म्हटले. 

मंत्रालयाने पुढे म्हटले की, सामान्य लोकांना आरोग्याचा धोका उद्भवू नये यासाठी राज्यांनी आरोग्याच्या क्षेत्रात सुधारणा करण्याच्या प्रक्रियचे नेतृत्त्व केले पाहिजे. आरोग्य क्षेत्रातील सुधारणासाठी निर्धारित नियमांनुसार योजना लागू करण्यासाठी संबंधित राज्य सरकारांकडून प्रभावी रुपाने नेतृत्त्व केले जाऊ शकते. 

राज्यांचा दिशानिर्देश आणि योजनांच्या अंमलबजावणीचा संबंध आहे. त्यात केंद्राची प्रत्यक्ष भूमिका नाही आणि हे निर्धारित दिशानिर्देशांनुसार योजना लागू करण्यासाठी संबंधित राज्य सरकारांकडे विशेषाधिकार आहे, असे मंत्रालयाने म्हटले. मंत्रालय केवळ योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारांना आर्थिक पाठबळ देते.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयाला म्हटले की, भारताने स्पष्ट रुपाने व्यक्त उद्देश, रणनीतिक विषय आणि त्याच्या अंमलबजावणीच्या रणनीतीबरोबर एक व्यापक आणि समग्र राष्ट्रीय लोकसंख्या नीती (एनपीपी) 2000 चा अवलंब केला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT