Mahua Moitra sakal
देश

Mahua Moitra: खासदारकी गेल्यानंतर आता मोइत्रा निवडणूक लढवू शकतात का? कोर्टात जाऊ शकतात का?; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

'कॅश फॉर क्वेरी' प्रकरणात तृणमुलच्या खासदार महुआ मोइत्रांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : 'कॅश फॉर क्वेरी' प्रकरणात तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. मोइत्रांसाठी हा मोठा झटका ठरला आहे पण आपण निर्दोष असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

यामुळं वातावरणही चांगलंच तापलं आहे. ही चुकीच्या कामाची शिक्षा असल्याचं भाजपनं म्हटलं आहे तर ही लोकशाहीची हत्या असल्याची प्रतिक्रिया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली आहे. पण या प्रकरणामुळं अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

त्यानुसार, आता त्या पुन्हा निवडणूक लढू शकतात का? संसदेतील या प्रकरणात कोर्टाकडून त्यांना दिलासा मिळू शकतो का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. काय आहे हे प्रकरण? जाणून घेऊयात सविस्तर (Can Mahua Moitra contest elections now after expelled can she go to court need to know)

पुन्हा निवडणूक लढता येईल?

होय, महुआ मोइत्रा निवडणूक लढवू शकतात. कारण या प्रकरणात आत्तापर्यंत केवळ एथिक्स कमिटीची चौकशी केली आहे. सीबीआयची चौकशी सुरु आहे. मोठी गोष्ट ही आहे की, आर्थिक देवाण-घेवाणीची जे आरोप लावले आहेत. त्याची देखील सीबीआय पडताळणी करत आहे. जर हे आरोप खरे ठरले तरच याला गुन्हेगारी प्रकरणं समजलं जाईल. त्यानंतर महुआ मोइत्रांना निवडणूक लढवणं अवघड होईल. (Latest Marathi News)

खरंतर मोइत्रा दोषी ठरल्या आणि त्यांना जास्तीत जास्त दोन वर्षांची शिक्षा झाली तर त्या स्थितीत त्या खरंच निवडणूक लढवू शकणार नाहीत. पण सध्याच्या स्थितीत त्या लोकसभेची निवडणूक लढवू शकतात. कारण याची चौकशी प्रक्रिया दीर्घकालीन आणि गुंतागुंतीची असणार आहे.

कोर्टाकडून दिलासा मिळू शकतो का?

याचंही उत्तर होय असं आहे. कारण महुआ मोइत्रा यांना दाद मागण्यासाठी कोर्टाचे दरवाजे खुले आहेत. कलम ३२ अंतर्गत तर त्या थेट सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतात. पण आता या लोकसभेचा कार्यकाळ संपणारच आहे. त्यामुळं त्यांना तातडीनं दिलासा मिळणं अवघड आहे.

पण त्या एथिक्स कमिटीच्या निर्णयाला आव्हान जरुर देऊ शकतात. कारण सुप्रीम कोर्टात अशा प्रकारे लोकसभा अध्यक्षांनी दिलेल्या आदेशाला कोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. अनेकदा संसदेनं मंजूर केलेल्या कायद्यांना कोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. (Marathi Tajya Batmya)

इतरही खासदार अडकणार का?

हो, याचिही शक्यता आहे. या प्रकरणात महुआ मोइत्रांशिवाय इतरही अनेक खासदार फसू शकतात. कारण खुद्द मोइत्रांनी म्हटलं आहे की, इतर खासदारही बाहेरच्या लोकांच्या मदतीनं प्रश्न विचारतात. पण इथं एक मोठा फरक असा आहे की, यामध्ये पैशांची देवाण-घेवाण होते की नाही. (Latest Marathi News)

पण पैसे घेऊन प्रश्न विचारणं हे अनैतिक असून तो भ्रष्टाचारच आहे. तसेच संसदेचा पासवर्ड जर बाहेर कोणाशी शेअर केला गेला तर त्यालाही गुन्हा मानलं जातं. त्यामुळं जर मोइत्रांच्या आरोपांची देखील चौकशी झाली तर इतरही खासदार या प्रकरणात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

Rain-Maharashtra Latest Live News Update: ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प- ईसापुर धरण पाणी पातळी वाढ

Asia Cup साठी श्रेयस अय्यरला डावलल्यानंतर अजित आगरकरसोबतचे जुने मतभेद पुन्हा चर्चेत; वाचा सविस्तर

Madhuri Elephant Care : कोण म्हंटल माधुरी हत्तीचा विषय शांत झालाय, वनताराची टीम पुन्हा नांदणीत; आजच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT