देश

CM चन्नींवर कॅप्टन अमरिंदरसिंगांचे गंभीर आरोप; रात्री 1 वाजता महिला IAS ला...

आपण मुख्यमंत्री असताना ही घटना घडली होती असं कॅप्टन यांनी सांगितलं आहे.

सुधीर काकडे

पंजाबमध्ये (Punjab) विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections 2022) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेस (Congress) आणि भाजपसह (BJP) आम आदमी पक्षानेही (AAP) पंजाबमध्ये मोठी ताकद लावल्याचं पाहायला मिळतंय. भारतीय जनता पक्षाचे कॅप्टन अमरिंदरसिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील शाब्दिक युद्ध थांबवण्याचं नाव घेत नाहीये. त्यातच आता कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नींवरसुद्धा (CM Charanjitsingh Channi) गंभीर आरोप केले आहेत.

अमरिंदरसिंग यांनी चन्नींवर महिला अधिकाऱ्यांना त्रास दिल्याचा आरोप केला आहे. चन्नींवर आरोप करताना ते म्हणाले की, चन्नी त्यांच्या भागात तैनात असलेल्या एका महिला आयएएस अधिकाऱ्याला फोन करून त्रास द्यायचे. त्यानंतर माझ्या सांगण्यावरून चन्नी यांनी त्यांची माफी मागितली. अमर उजालाच्या वृत्तानुसार अमरिंदरसिंग यांनी ही घटना सविस्तर सांगितल्याली. ते म्हणाले, "मी मुख्यमंत्री असताना माझ्याकडे एक आयएएस पती-पत्नी आले होते. दोघंही अधिकारी होते. मी त्यांना भेटलो तेव्हा त्या महिला आयएएसने सांगितलं की, त्या रोपरच्या एसडीएम आहेत. त्या म्हणाल्या की, 'चन्नी रोज रात्री एक-दोन वाजता फोन करून त्रास देतात आणि मला ते सहन होत नाहीये.' तेव्हा आपण त्यांना म्हणालो की, ही खूप वाईट गोष्ट आहे आणि दुसऱ्या दिवशी चन्नी यांना फोन करून जाब विचारला. तेव्हा सुरुवातीला चन्नींनी आरोप फेटाळले मात्र, नंतर मला सांगितलं की, चूक झाली. मग मी म्हणालो आधी जा आणि त्या महिला IAS ची माफी मागून या, तिने माफ केले तर ठीक आहे. अन्यथा कारवाई करेन.

दरम्यान, चन्नी यांनी एका मुलाखतीमध्ये आपला आणि कॅप्टन अमरिंदरसिंग यांचा फारसा संवाद होत नसत असं सांगितलं होतं. काही वेळा झाला त्यातही ते रागवण्यासाठीच फोन करायचे असंही चन्नी म्हणाले होते. त्यामुळे त्यांच्यावर केलेल्या या गंभीर आरोपांनंतर चन्नी आता नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गोराईत रडार, दहिसरमध्ये विकास; राज्य सरकारचा मोठा निर्णय, गृहनिर्माण प्रकल्पांना गती

IPL 2026 Auction : गडी पेटला... सर्फराज खानने २२ चेंडूंत चोपल्या ७३ धावा, ३३१.८२ चा स्ट्राईक रेट; सेलिब्रेशन तर भन्नाटच Video Viral

प्रेक्षकांना कसा वाटला 'वचन दिले तू मला' मालिकेचा पहिला भाग? नेटकरी म्हणतात, 'एपिसोड छान होता पण...'

Kolhapur Muncipal : मनपा निवडणूक आचारसंहिता लागू होताच कारवाई; कोल्हापुरात इच्छुकांचे फलक हटवले

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद खंडपीठात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी

SCROLL FOR NEXT