car accident car accident
देश

पुन्नी जत्रा पाहण्यासाठी गेलेल्या महिलांचा अपघात; ६ ठार तर ४ गंभीर

सकाळ डिजिटल टीम

दुर्ग-भिलाई येथील सुभाषनगर येथील रहिवासी असलेल्या नऊ महिला पुन्नी जत्रेत सहभागी होण्यासाठी बुधवारी सकाळी कारने राजीमकडे जाण्यासाठी निघाल्या. रायपूरच्या पुढे अभानपूरच्या केंद्री गावाजवळ पोहोचले असता भरधाव असलेली कार नियंत्रणाबाहेर जाऊन दुभाजकावर (car accident) आदळली. या अपघातात सहा महिलांचा मृत्यू झाला, तर तीन महिला आणि चालक गंभीर जखमी झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुचिता साहू (वय ६५), काजल (६०), सविता दास (६५), रीना चौधरी (७५), रीना दास (७५) आणि अर्चना मोला (४०) अशी मृत महिलांची नावे आहेत. छत्तीसगडमधील राजीम पुन्नी जत्रा पाहण्यासाठी या महिला कारने निघाल्या होत्या. रायपूर जिल्ह्यातील अभानपूरला लागून असलेल्या केंद्रीजवळ निर्माणाधीन रस्त्याच्या दुभाजकावर त्यांची कार आदळली.

यावेळी रस्त्याचे बांधकाम सुरू होते. कारचा वेग जास्त असल्याने अपघात (car accident) घडला. अपघातात कारमधील सर्वजण गंभीर जखमी झाले. यात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा वाटेतच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. तीन गंभीर जखमी महिला आणि चालकाला रायपूर येथील आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी जखमींना रायपूर येथील आंबेडकर रुग्णालयात दाखल केले आहे.

सर्व जखमींची प्रकृती गंभीर

रुग्णालयात दाखल सर्व जखमींची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. एकाचवेळी सहा महिलांचा मृत्यू झाल्याने भिलाई (Chhattisgarh) येथील महिलांच्या वस्तीवर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या दुर्घटनेत सहा महिलांच्या मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. जखमींना उत्तम उपचार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT